शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या  चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:27 IST

हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या  वर पक्षातील चौघांविरुद्ध वधू पक्षाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देवर पक्षाने ऐनवेळी लग्नास दिला नकार

आॅनलाईन लोकमतनागपूर : हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या  वर पक्षातील चौघांविरुद्ध वधू पक्षाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.तुकडोजी पुतळ्याजवळच्या न्यू सोमवारी क्वॉर्टर परिसरात कुंदा विठ्ठलराव गायकवाड (वय ४८) राहतात. त्यांच्या मुलीचे लग्न दिल्लीत राहणाऱ्या रोहित अनिल खंडागळे याच्यासोबत जुळले. दोन्हीकडून आधीच ठरवण्यात आल्याप्रमाणे देणे-घेणे झाले. दोन्ही पक्षातील मंडळी ३ सप्टेंबरपासून एकमेकांच्या संपर्कात होती. परस्पर संमतीने रविवारी १० डिसेंबर २०१७ ला हे लग्न पार पाडण्याचे ठरले. १८ नोव्हेंबरला अचानक वर पक्षातील मंडळींनी लग्न समारंभाच्या खर्चासाठी वधू पक्षाकडे पैशाची मागणी केली. आधीच खर्च झाल्यामुळे आता अतिरिक्त पैसे देणे शक्य नाही, असे म्हणून वधूच्या आई कुंदा गायकवाड यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोन्ही पक्षातील कुरबुरी वाढत गेल्या. मात्र, होईल सगळ व्यवस्थित असे समजून वधू पक्षाकडून लग्नाची पूर्ण तयारी करण्यात आली. त्यासाठी वधूच्या आईने ६ लाख, ४० हजारांचा खर्च केला. दरम्यान, पैसे दिले नाही म्हणून वराकडील मंडळींनी लग्न लावण्यास नकार दिला. रविवारी लग्नाचा मुहूर्त जवळ आला तरी वर पक्षाची नकारघंटा कायमच होती. त्यामुळे हे लग्न झालेच नाही. आपल्याला एवढा खर्च करायला लावून ऐनवेळी लग्नास दिल्यामुळे वधूची आई कुंदा गायकवाड यांनी वर रोहित अनिल खंडागळे, त्याचे वडील अनिल खंडागळे, रेखा खंडागळे आणि आशा कदम या चौघांविरुद्ध हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक वडोदे यांनी त्यावरून उपरोक्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.लॉन सजले, मात्र समारंभच नाहीरविवारी हे लग्न होणार होते. त्यामुळे हुडकेश्वरमधील पिपळा फाट्यावर असलेले मिरा लॉन सजले. बरेचसे पाहुणेही आले. परंतु वरातच आली नाही. त्यामुळे लग्न समारंभ पार पडला नाही.

टॅग्स :dowryहुंडाnagpurनागपूर