शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खुनासाठी अपहरणाचे प्रकरण गुन्हे शाखेकडे हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:57 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनासाठी अपहरणाचे प्रकरण सखोल तपासाकरिता गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : तहसील पोलिसांवर असक्षमतेचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनासाठी अपहरणाचे प्रकरण सखोल तपासाकरिता गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले आहे. या प्रकरणात तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. परंतु, त्यांनी तपासामध्ये काहीच ठोस प्रगती केली नाही. हे प्रकरण सक्षम तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यासाठी अपहरण झालेल्या मुलाचे वडील शेख हुसैन शेख नजीब यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ते मोमीनपुरा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलाचे नाव शेख अश्फाक आहे. हुसैन यांनी जावई अश्रफ राणा इफजुल रहमानवर अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. अश्रफ राणाने अश्फाकचे अपहरण करून त्याचा खून केला व मृतदेह नष्ट केला असा हुसैन यांचा आरोप आहे. अश्फाकला दारूचे व्यसन होते. अश्रफ राणाने दारूचे व्यसन सोडविण्यासाठी अश्फाकला लखनौ येथे येण्यास तयार केले. ते दोघेही ५ आॅक्टोबर २०१६ रोजी रेल्वेने लखनौकडे रवाना झाले. त्यानंतर १३ आॅक्टोबर २०१६ रोजी अश्रफ राणा एकटाच घरी परतला. चौकशी केली असता अश्रफ राणाने तो ९ आॅक्टोबर २०१६ रोजी इटारसी रेल्वे स्थानकावर अश्फाकपासून वेगळा झाल्याची माहिती दिली. परिणामी, हुसैन यांनी १६ जानेवारी २०१७ रोजी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून अश्रफ राणाला अटक केली. परंतु, त्यानंतर तपासामध्ये काहीच ठोस प्रगती झाली नाही. त्यामुळे हुसैन यांनी तहसील पोलिसांवर असक्षमतेचा आरोप करून प्रकरण दुसऱ्या तपास संस्थेकडे हस्तांतरित करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. राजेश नायक व अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMurderखून