शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

व्यंगाचित्र असतात समाज मनाचा आरसा - मोहन राठोड

By admin | Updated: May 5, 2016 20:01 IST

व्यंगचित्रकार आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये समाजात घडणाऱ्या घटना व्यंगचित्रांतून मांडतात.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.5 : व्यंगचित्रकार आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून वृत्तपत्र व नियतकालिकांमध्ये समाजात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, श्रृंगारिक, क्रीडाक्षेत्र, सिनेक्षेत्र तसेच प्रबोधनात्मक विषयावरील संदेश मोठ्या खुबीने देतात. यामुळे अनेक लेखांचे काम एक व्यंगचित्र पूर्ण करते, असे प्रतिपादन माहिती संचालक मोहन राठोड यांनी आज केले.कार्टूनिस्ट झोन वेलफेअर ऑर्गनायझेशन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या सभागृहात आज ह्यजागतिक व्यंगचित्र दिनाह्णचे औचित्य साधून व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती संचालक मोहन राठोड यांनी फित कापून केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यंगचित्रकार विनय चाणेकर, जी.एन. बोबडे, विष्णू आकुलवार, राजीव गायकवाड, वैशाली पखाले , जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे तसेच व्यंगचित्र प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रदर्शनाची पाहणी करताना मोहन राठोड पुढे म्हणाले की, व्यंगचित्रातून मिळणाऱ्या मौलिक माहितीमुळे समाजात जनजागृती होण्यास मदत होते. वेळेअभावी नागरिकांना मोठे लेख, स्तंभ,संपादकीय वाचायला वेळ मिळत नाही. परंतु व्यंगचित्राच्या माध्यमातून संपूर्ण लेखाचे सार चटकन लक्षात येवून अर्थबोध होतो. तसेच व्यंगचित्रातील विनोद आणि कोपरखळ्यांमुळे धकाधकीच्या जीवनात करमणूकीचे व आनंदाचे क्षण मिळतात. यासाठी भविष्यात व्यंग चित्राकारांनी काढलेल्या व्यंगचित्र कलेचा समाजात जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. तसेच व्यंगचित्रकारांना त्यांच्या कलेसाठी योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी कार्टूनिस्ट झोन वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष विनय चाणेकर म्हणाले की, जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त विदर्भातील सर्व व्यंगचित्रकारांनी एकत्रित येऊन दर्जेदार व्यंगचित्राची निर्मिती करुन समाज प्रबोधनाचे कार्य करावे. तसेच उदयोन्मुख व्यंगचित्रकारांसाठी व्यासपीठ निर्माण करावे. असे त्यांनी सांगितले.

समाजात आतापर्यंत खूप मोठे कार्टूनिस्ट होऊन गेले त्यात बाळासाहेब ठाकरे, आर.के. लक्ष्मण, सुधीर तेलंग इत्यादी. आणि सध्या कार्यरत मध्ये राज ठाकरे, शि. द. फडणीस, वसंत सरोटे, मंगेश तेंडुलकर, मनोहर सप्रे, जयंत काकडे, घनशाम देशमुख, विनय चाणेकर, राजीव गायकवाड, गणेश बोबडे इत्यादी व्यंगचित्राच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे काम करीत आहे.

या दोन दिवसीय व्यंगचित्र प्रदर्शनात 150 व्यंगचित्रांचा समावेश असून त्यात राजकीय, सामाजिक, श्रृंगारिक, प्रबोधनात्मक व विविध विषयांचा समावेश आहे. या प्रदर्शनामध्ये विदर्भातील व्यंगचित्रकारांबरोबरच मुंबई, पुणे व धुळे येथील नामवंत व्यंगचित्रकारांनी काढलेल्या व्यंगचित्राचा समावेश आहे. हे प्रदर्शन दि. 6 मे 2016 पर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.