शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कार्लस्रू पर्यावरणपूरक वाहतूक प्रकल्प लाभकारक : अभिजित बांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 01:29 IST

कार्लस्रू शहरातील पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. तशा प्रकारची वाहतूक व्यवस्था भविष्यात नागपुरात अस्तित्वात आली तर नागपूर देशासाठी आदर्श ठरेल. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘सिटी टू सिटी पेअरिंग’च्या दोन्ही शहरांतील उत्तम प्रकल्पांची देवाणघेवाण होते. कार्लस्रूमधील चांगले प्रकल्प नागपुरात राबविण्यात येईल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देवाहतूक व्यवस्था: तर नागपूर देशासाठी आदर्श ठरेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार्लस्रू शहरातील पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. तशा प्रकारची वाहतूक व्यवस्था भविष्यात नागपुरात अस्तित्वात आली तर नागपूर देशासाठी आदर्श ठरेल. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘सिटी टू सिटी पेअरिंग’च्या दोन्ही शहरांतील उत्तम प्रकल्पांची देवाणघेवाण होते. कार्लस्रूमधील चांगले प्रकल्प नागपुरात राबविण्यात येईल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या ‘सिटी टू सिटी पेअरिंग’ कार्यक्रमांतर्गत नागपूर आणि जर्मनी यांच्यात झालेल्या करारानुसार कार्लस्रू येथील शिष्टमंडळ नागपुरात दाखल झाले आहे. नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडतर्फे मोबीलाईज युअर सिटी या विषयावर महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी एनएसएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, े मुख्य महाव्यवस्थापक राजेश दुफारे, विजय बनगीरवार, देवेंद्र महाजन, मेट्रोचे कार्यकारी संचालक (नियोजन) एस.के. सिंगला, सहमहाव्यवस्थापक महेश गुप्ता, वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त राजतिलक रोशन, महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, वाहतूक अभियंता आसाराम बोदिले,रजनीश पोरवाल, जीटीचे प्रकल्प संचालक अरुण सेलवरसु, मनपाचे शहर अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते. कार्लस्रू शिष्टमंडळात कार्लस्रूच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे इनोव्हेशन हेड राफ ईकॉर्न ,कार्लस्रू डिजीटलचे स्टीफन आदी उपस्थित होते.प्रारंभी रामनाथ सोनवणे यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात सादरीकरण केले. सादरीकरण केले. शिष्टमंडळाने कार्लस्रू शहरात आवागमनासाठी सायकलचा उपयोग किती प्रभावीपणे केला जातो, प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी त्याची कशी मदत होत आहे, याबाबत माहिती दिली.महापालिका महामेट्रो, एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी प्रकाश टाकला. नागपूर महापालिकेच्या वाहतूक विभागाचे व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी नागपूर मनपाच्या परिवहन सेवेची माहिती दिली. परिवहन अभियंता आसाराम बोदिले यांनी नागपूर शहरातील परिवहन व्यवस्थेच्या व्यापक नियोजनावर सादरीकरण केले. महामेट्रोच्या वतीने सहमहाव्यवस्थापक महेश गुप्ता यांनी बाईक शेअरिंग प्रकल्पावर सादरीकरण केले.अभिजीत बांगर यांनी कार्लस्रूच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. गुरुवारीही विविध प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGermanyजर्मनी