शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

कारगील विजय दिन; हात फ्रॅक्चर, तरी २८ दिवस बजावली सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 11:05 IST

कारगीलची लढाई म्हणजे वीरश्रीचा इतिहास ! सैनिकांची मने त्वेषाने पेटून उठलेली अन् देशवासीयांची मने प्रचंड भारवलेली. कारगीलच्या या ६० दिवसांच्या लढाईत सबंध देश सैनिकांच्या पाठीशी होता.

ठळक मुद्देकुहीच्या निवृत्त नायकाने सांगितले अनुभव

गोपालकृष्ण मांडवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारगीलची लढाई म्हणजे वीरश्रीचा इतिहास ! सैनिकांची मने त्वेषाने पेटून उठलेली अन् देशवासीयांची मने प्रचंड भारवलेली. कारगीलच्या या ६० दिवसांच्या लढाईत सबंध देश सैनिकांच्या पाठीशी होता. जीवाची आणि खाण्यापिण्याची पर्वा न करता सैनिकांनी लढा जिंकला. कुणी चार दिवस उपाशाी राहिले तर कुणी आपल्याच रक्तबंबाळ होऊन धारातीर्थी पडलेल्या सहकाऱ्याच्या हातातील बंदूक घेऊन शत्रूवर निशाणा साधला...! सारेच काही भारावलेले !ही लढाई सर्वांचीच होती. लष्करातील प्रमुखांपासून तर सर्वसामान्य सैनिकांपर्यंत सारेच पेटून उठले होते. नागपूर जिल्ह्यातून सैन्यात दाखल असलेल्या हजारो जवानांनी या लढाईत सहभाग घेतला. कुहीतील गौतम बाबूराव कांबळे या सैनिकाचाही या लढाईत सहभाग होता. योगायोग असा की, ज्या उधमपूर नॉर्थ कमांडअंतर्गत ही लढाई झाली त्याच कमांडमध्ये या नागपूरकर पुत्राचा सहभाग होता. कारगील विजय दिनाच्या निमित्ताने या सैनिकाने ‘लोकमत’जवळ आठवणी सांगितल्या. आठवणींचा एकेक पट उलगडत गेला आणि जवानांच्या वीरश्रीचा इतिहासही पुन्हा प्रकाशमान होत गेला.गौतम कांबळे १९९९ मध्ये उधमपूरमध्ये नायक पदावर सेवेला होते. सीमेवरून येणारे तोफगोळे, घुसखोरांना परतवणे हे नेहमीचेच सुरू असतानाच कारगील युद्धाला प्रारंभ झाल्याची बातमी वरिष्ठांनी या तुकडीला सांगितली. कमांडरकडून युद्धाचे आदेश आले. सज्जतेचा इशारा मिळाला. भविष्यातील सर्व योजना रहित करून सोबतचे सैनिकही सज्ज झाले. कामांची विभागणी आणि जबाबदारी वाटल्या गेली. गौतम कांबळे यांना सैन्यासाठी वाहतुकीचा मार्ग खुला करून देण्याची जबाबदारी मिळाली. सोबत अन्य तीन सहकारी होते. सीमेवर रसद घेऊन जाणाºया वाहनांना वाट मोकळी करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पाच किलोमीटर परिसरात काही अघटित घडू नये, वाहने विना अडथळ्याने पुढे काढण्२२याचे काम तसे जोखिमीचेच!जंगल, खाई, खडकातून मार्ग काढत लष्कराची वाहने पास करावी लागायची. काम तसे लहानसे, पण जोखीमही तेवढीच मोठी. वाहन अडलेच आणि सैन्याला वेळेवर रसद आणि सैन्यबळ पोहचले नाही तर गंभीर प्रसंग उभा होणार होता. मात्र कांबळे यांच्या चमूने अडचणीवर मात केली. अशातच एका बेसावध क्षणी ते दुचाकीसह खोल खड्ड्यात पडले. हात फ्रॅक्चर झाला. दुचाकी चालविणेही कठीण झाले. तरीही यास्थितीत त्यांनी तळ गाठला.हाताचे हाड तुटल्याने डॉक्टरांनी त्यात रॉड टाकलेला होता. आॅपरेशननंतर लगेच बँडेज चढवून ते दुसºया दिवशी सेवेला हजर झाले. अशाही स्थितीत २८ दिवस त्यांनी सेवा बजावली. काम जोखिमीचे, झोपायलाही वेळ नसायचा. डोळ्यात तेल घालून अहोरात्र सेवा द्यावी लागायची. थोडीशी डुलकीही पुरे असायची. देशप्रेमापुढे हाताच्या वेदनाही क्षुल्लक ठरत होत्या.जवळपास ६० दिवस चाललेल्या या लढाईत दोन लाख सैनिकांना विविध जबाबदाऱ्यांवर सरकारने पाठविले होते. तोफगोळे, तप्त ज्वाला अन् बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करीत ५२७ सैनिकांनी भारतमातेच्या वेदीवर आपले प्राण अर्पण केले. ६० दिवसांच्या लढाईनंतर २६ जुलै १९९९ रोजी या युद्धसंघर्षाची अधिकृ तपणे सांगता झाल्याची घोषणा झाली.

विजय गौतम कांबळेंच्या धैर्याचाही!युद्धानंतर नऊ महिन्यांनी सर्वकाही स्थिरस्थावर झाले. देशाच्या सीमा शांत झाल्या. गौतम कांबळे नऊ महिन्यांनी सीमेवरून कुहीला रजेवर परतले. देशाचे रक्षण करून परतलेल्या या वीरपुत्राची गावाने आस्थेवाईकपणे चौकशी केली. कुटुंबाच्या भेटीनंतर आनंदाश्रूंना वाट मोकळी झाली. ज्येष्ठांनी डोक्यावरून हात फिरवून सुखरूप परतल्याचा आनंद व्यक्त केला. तिकडे कारगीलचा विजय झाला अन् इकडे गौतम कांबळेंच्या धैर्याचाही! देशासाठी स्वत:च्या वेदनांची पर्वा न करणारे गौतम कांबळे सध्या नागपुरातील वन विभागात सेवा बजावत आहेत.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिन