तहसील पोलिसांचे पथक शुक्रवारी रात्री मोमीनपुऱ्यातील बकरा मंडी परिसरात गस्त करीत असताना त्यांना दोन संशयित तरुण दिसले. पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून ते पळू लागले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यातील सोहेल खान ऊर्फ माया सिराज खान (वय २३) याला पकडले. त्याचा साथीदार मुद्दसिर ऊर्फ गोलू (वय २८) पळून गेला. पकडलेल्या सोहेल खानच्या ताब्यातून पोलिसांनी एक किलो, २८० ग्रॅम गांजा जप्त केला. तहसीलचे ठाणेदार जयेश भंडारकर, पीएसआय स्वप्नील वाघ, संजय दुबे तसेच कर्मचारी शंभुसिंग किरार, रणजित बावणे, रुपेश सहारे, कृष्णा चव्हाण, गगन यादव, यशवंत डोंगरे आणि रुपाली मोतीकर यांनी ही कामगिरी बजावली.
---
लकडगंजमध्येही सापडला गांजा
गुन्हे शाखा युनिट ३ ने लकडगंजमधील अमरदीप टॉकीजच्या मागे आरोपी अब्दुल आसिफ बनी शेख (वय ४५) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ७५० ग्रॅम गांजा जप्त केला. एका ऑटोतून तो गांजा तस्करी करीत होता. हा ऑटोही पोलिसांनी जप्त केला.
---