शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Maharashtra Election 2019; उपराजधानीतील उमेदवारांमध्ये उच्चशिक्षितांचा ‘दुष्काळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 11:03 IST

विधानसभा निवडणुकांसाठी नागपुरातील सहाही मतदारसंघातून उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. शहरातील एकूण ८४ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही.

ठळक मुद्दे५७ टक्के उमेदवार ‘अंडरग्रॅज्युएट’१३ टक्केच पदव्युत्तर

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकांसाठी नागपुरातील सहाही मतदारसंघातून उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. शहरातील एकूण ८४ उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर १३ टक्के उमेदवारच पदव्युत्तर पदवीधारक आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडे तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीतच. अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येदेखील पदवीधरांचे प्रमाण कमीच आहे, हेच चित्र समोर येत आहे.विधी शाखेचे सर्वाधिक पदवीधरएकूण पदवीधर उमेदवारांमध्ये विधी तसेच कला विषयांतील सर्वाधिक पदवीधर आहेत. एकूण पदवीधरांच्या तुलनेत ८.३३ टक्के उमेदवार हे विधी पदवीधर आहेत. विज्ञान (३.५७ %), वाणिज्य (७.१४ %), कला (३.५७ %), ‘बीबीए’ (२.३८ %) पदवीधरदेखील मैदानात आहेत. १३.१० टक्के उमेदवारांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे. यात ‘एमएस्सी’, ‘एमए’, ‘एमबीए’, एमडी’, ‘एमएड’ हे अभ्यासक्रम शिकलेल्यांचा समावेश आहे. ३.५७ % उमेदवार हे आचार्य पदवीप्राप्त आहेत.विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांचे शिक्षणदक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघया मतदारसंघातील १७ उमेदवारांपैकी आठ उमेदवारांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झाले आहे. प्रत्येक एक उमेदवार ‘आयटीआय’ व पदविका शिकलेला आहे. दोन जणांकडे अनुक्रमे विज्ञान व वाणिज्य शाखेची पदवी आहे. तर दोन उमेदवारांनी ‘एलएलबी’ केले आहे. एका उमेदवाराने ‘एमटेक’ केले असून एकच उमेदवार ‘पीएचडी’ प्राप्त आहे.उत्तर नागपूर मतदारसंघया मतदारसंघातील १४ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झाले आहे. एका उमेदवाराने पदविका तर दोघांनी ‘एलएलबी’चे शिक्षण घेतले आहे. दोघांनी ‘बीबीए’, तर आणखी दोघांनी विज्ञान व कला शाखेची पदवी संपादित केली आहे. एका उमेदवाराने ‘एमडी’चे शिक्षण पूर्ण केले असून एक उमेदवार ‘पीएचडी’धारक आहे.दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघयेथील २० उमेदवारांपैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे ११ उमेदवार हे बारावीपर्यंतच शिक्षित आहेत. एका उमेदवाराने पदविका घेतली आहे. दोघांनी ‘एलएलबी’चे शिक्षण घेतले आहे. दोघांनी कला तर एकाने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे एक उमेदवार ‘एमटेक’ आहे तर एकाने ‘पीएचडी’ पूर्ण केली आहे. एकाने शिक्षणाबाबत माहितीच दिलेली नाही.मध्य नागपूर मतदारसंघमध्य नागपुरातील १३ पैकी दोन उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंतदेखील झालेले नाही. दोघांनी दहावी तर एकाने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ‘आयटीआय’ (एक), पदविका (दोन), ‘एलएलबी’ (एक), बीएस्सी (एक) असे उमेदवारांचे शिक्षण आहे. प्रत्येकी एका उमेदवाराने ‘एमबीए’, ‘एमएड’ व ‘एमएससी’ पदवी प्राप्त केली आहे.पूर्व नागपूर मतदारसंघया मतदारसंघात सातपैकी अवघा एकच उमेदवार पदवीधर आहे. एका उमेदवाराने दहावीहून कमी शिक्षण घेतले आहे. तिघांनी दहावीपर्यंत तर दोघा उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. येथील एकही उमेदवार पदव्युत्तर शिक्षण घेतलेला नाही.पश्चिम नागपूर मतदारसंघयेथील १२ पैकी ३ उमेदवारांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. तर तीन उमेदवार हे दहावीपर्यंतदेखील शिकलेले नाहीत. तीन उमेदवार ‘बीकॉम’ पदवीधर असून एकाने कला शाखेतील पदवी प्राप्त केली आहे. एक उमेदवार वैद्यकीय शिक्षण घेतलेला आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019