शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर राहणार वॉच : अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 21:13 IST

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजेच आजपासून उमेदवारांच्या खर्चाचे मिटर सुरू झाले असून उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक खर्चावर निवडणूक विभागाची बारीक नजर राहणार आहे. प्रचार संपण्यापूर्वी उमेदवारांना तीन वेळा खर्चाची माहिती सादर करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देप्रत्येक विधानसभेत व्हीएसटी चमू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजेच आजपासून उमेदवारांच्या खर्चाचे मिटर सुरू झाले असून उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक खर्चावर निवडणूक विभागाची बारीक नजर राहणार आहे. प्रचार संपण्यापूर्वी उमेदवारांना तीन वेळा खर्चाची माहिती सादर करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये व्हिडीओ सर्व्हिस टीम (व्हीएसटी) गठित करण्यात आली आहे. ही टीम प्रत्येक उमेदवाराच्या सभा व प्रचाराचे चित्रीकरण करेल. उमेदवारांनी दिलेल्या खर्चाची माहिती योग्य आहे की नाही, याची उलट तपासणी एसओआरच्या माध्यमातून करण्यात येईल. दोघांच्या खर्चाच्या आकड्यात तफावत आढळल्यास संबंधित उमेदवारास नोटीस बजावण्यात येईल. यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.जिल्ह्यात एकूण ८२ संवेदनशील मतदान केंद्र्र आहेत. यामध्ये ५२ केंद्र्र नागपूर शहर व ३० रामटेक लोकसभा मतदारसंघात आहेत. या ठिकाणी निवडणुकीच्या मतदानाचे वेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. संवेदनशील परिसरात मतदान शांततेत पार पडावे यासाठी सीआयएसएफ व सीआरपीएफच्या तुकड्यांची साथ मिळणार आहे. सीआयएसएफचे पथकही जिल्ह्याला याकामी प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने याकामी आवश्यक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. सध्या शहरात तीन व रामटेक मतदारसंघात दोन प्रशिक्षण वर्ग पार पडले आहेत. दुसºया टप्प्याचे प्रशिक्षण २२ मार्चपासून सुरू होणार असून, प्रशिक्षणालाही कर्मचाºयांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले.पत्रपरिषदेला अतरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.ती रोख रक्कम निवडणुकीशी संबंधित नाहीआदर्श आचारसंहितेच्या काळात रामटेक व सावनेर तालुक्यांतर्गत ८७ लाख ६० हजाराची रोकड पकडण्यात आली होती. परंतु ही रक्कम निवडणुकीशी निगडित नाही, असे जिल्हाधिकारी मुदगल यांनी स्पष्ट केले. ती रक्कम जिनिंग व्यवसायाशी संबंधित असून, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यावर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.ईव्हीएमची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणालीनिवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीनची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला जीपीएस प्रणालीद्वारे जोडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले. निवडणुकीत लागणाºया वाहनांसाठी विविध विभागांकडून वाहनांची मागणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आवश्यक तितकी वाहने प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. जे विभाग वाहन देण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यांच्याकडून पोलीस व वाहतूक विभागाकडून वाहने जप्त करण्यात येत आहेत. आवश्यकता भासल्यास विभागप्रमुखांवर कारवाईसुद्धा करण्यात येईल, असा इशाराही मुदगल यांनी दिला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय