शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

‘मेट्रोरिजन’साठी उमेदवारांची गर्दी

By admin | Updated: April 23, 2015 02:30 IST

महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली.

नागपूर : महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली. एकूण २८ जागांसाठी ६२ अर्ज आले असून २४ तारखेला याची छाननी होणार आहे.महानगर नियोजन समितीच्या शहरातील २० तर ग्रामीण भागातील ८ अशा एकूण २८ जागांसाठी १७ मे रोजी निवडणूक होत आहे.. शहर विभागातील २० जागांसाठी एकूण ३२ अर्ज आले. यापैकी ११ अर्ज शेवटच्या दिवशी तर ग्रामीण भागातील ८ जागांसाठी एकूण ३० अर्ज आले; त्यापैकी २५ अर्ज शेवटच्या दिवशी सादर करण्यात आले. ग्रामीणमधून आलेल्या अर्जांमध्ये सावनेर १, हिंगणा ५, नागपूर ग्रामीण ७, पारशिवनी ४, कामठी ४ आणि मौदा येथून ९ उमेदवारांनी अर्ज भरले.शहरी भागातील मतदारसंघासाठी काँग्रेसने संजय महाकाळकर, दीपक कापसे, अरुण डवरे, प्रशांत धवड, रेखा बारहाते आणि सुरेश जग्यासी यांना उमेदवारी दिली आहे. महापालिकेतील सत्ताधारी नागपूर विकास आघाडीतर्फे २१ उमेदवारांनी अर्ज भरले असून, त्यात नरेंद्र बोरकर, देवेंद्र मेहेर, चेतना टांक, बंडू राऊत, प्रवीण भिसीकर, सुषमा चौधरी, सतीश होले, स्वाती आखतकर, साधना बरडे, मीना तिडके, राजू लोखंडे, परिणय फुके, अस्लम खान, अश्विनी जिचकार, नीलिमा बावणे, जयश्री वाडीभस्मे, दिव्या धुरडे, जगदीश ग्वालबंशी, भाग्यश्री कानतोडे, विद्या कन्हेरे आणि मंगला डवरे यांचा समावेश आहे. बसपातर्फे अभिषेक शंभरकर, सत्यभामा लोखंडे आणि मुरली मेश्राम यांनी अर्ज भरले आहे. शिवसेनेतर्फे अल्का दलाल, राष्ट्रवादीतर्फे प्रगती पाटील यांनी अर्ज भरला.ग्रामीणमधून रवींद्र चिखले, प्रकाश डोमकी, प्रवीण खाडे, देवराव कडू, संदीप घोये, विजय निकोसे, मनीष कारेमोरे, अमोल खोडके, नीता पोटफोडे, कल्पना राऊत, घनश्याम ठाकरे, ममता अंबीलुडके, रामेश्वर साठवणे, पार्वता आत्राम, चंदा जुगडे, मोहन माकडे, चांगो तिजारे, गीता घाटे, कांता बावनकुळे, सुनील कोहळे, राजू आखरे, भूषण बोरकुटे, कैलास वैद्य, फकीरा कुळमेते, राजेंद्र दुधबळे, जितेंद्र चव्हाण, नंदू धानकुटे, सूर्यकांत ढोबळे, चेतनलाल पांडे, लहू दहिफळे यांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)