शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

उपराजधानीतील खासगी हॉस्पिटलमधील कर्करोगाचा रुग्ण निघाला पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 22:25 IST

ऑटोमोटिव्ह चौकातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कर्करोगाच्या रुग्णावर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नमुने रविवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. रुग्णाला तातडीने मेयोमध्ये दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या १२८ : हॉस्पिटल सीलडॉक्टरांसह ५० वर आरोग्य सेवक क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑटोमोटिव्ह चौकातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कर्करोगाच्या रुग्णावर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नमुने रविवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. रुग्णाला तातडीने मेयोमध्ये दाखल करण्यात आले. खबरदारी म्हणून संबंधित खासगी हॉस्पिटल सील केले असून, येथील डॉक्टरांसह सुमारे ५० वर आरोग्य सेवकांना हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन करण्यात आले. या रुग्णासह नागपुरात रुग्णांची संख्या १२८ झाली आहे.उप्पलवाडी येथील रहिवासी असलेला ४४ वर्षीय पुरुष रुग्णाच्या कर्करोगावर १३ एप्रिल रोजी आॅटोमोटिव्ह चौकातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर हा रुग्ण घरी गेला. २४ एप्रिल रोजी हा रुग्ण नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आला. त्याची लक्षणे पाहता डॉक्टरांनी ‘कोविड-१९’ तपासणीचा सल्ला दिला. त्यांच्याकडून होकार मिळताच, मान्यताप्राप्त एका खासगी लॅबला याची माहिती दिली. लॅबच्या तज्ज्ञाचे त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले. रविवारी रात्री पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य वि•ाागाला देण्यात आली. त्यांनी पहाटे कर्करोग रुग्णाला मेयोमध्ये दाखल केले. खासगी हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर उपचार झाल्याने मनपाने मंगळवारी हे हॉस्पिटल सील केले. सोबतच रुग्णसेवेत असलेले डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना पुढील १४ दिवसांसाठी हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन केले. यांचे आज तातडीने नमुनेही घेण्यात आल्याची माहिती आहे.

रुग्णाचे पुन्हा तपासणार नमुनेया कर्करोग रुग्णाचा नमुना खासगी लॅबने तपासल्याने हा रुग्ण पॉझिटिव्ह समाजावा किंवा नाही, यावरून आज गोंधळ उडाला. यामुळे आता मेयोच्या प्रयोगशाळेमधून पुन्हा नमुने तपासले जाणार आहे. याला मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी दुजोरा दिला आहे. उद्या मंगळवारी नमुन्याचा अहवाल प्राप्त होणार आहे.वनामतीमध्ये होता तीन दिवस पॉझिटिव्ह रुग्णशुक्रवार २४ एप्रिल रोजी ‘एम्स’च्या प्रयोगशाळेत मोमीनपुरा येथील ४४ वर्षीय पुरुषाचे नमुने पॉझिटिव्ह आले. हा रुग्ण वनामतीमध्ये क्वारंटाईन होता. परंतु मनपाच्या पथकाला आज याची माहिती मिळाली. यामुळे रुग्णाला तातडीने मेडिकलमध्ये दाखल केले. सलग तीन दिवस वनामतीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १५९दैनिक तपासणी नमुने ३१२दैनिक निगेटिव्ह नमुने ३०३नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १२८नागपुरातील मृत्यू १डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३१डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १३१९क्वॉरंटाईन कक्षात एकूण संशयित ७५६- पीडित - १२८ - दुरुस्त - ३१_ - मृत्यू - १उत्तराखंडमध्ये अडकलाय नागपूरचा मेकअपमॅन! ()- नागपूरमध्ये परतण्यासाठी होतेय अडचणलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादु•ाार्वामुळे सारे जग जागच्या जागी थांबले आहे. कल्पनाविश्वात रममाण करून साऱ्यांना खिळवून ठेवणारे चित्रपट उद्योग क्षेत्रही लॉक झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होते. तेही रखडले आहे आणि चित्रिकरणात व्यस्त असलेली मंडळीही तिथेच अडकली आहे. अशाच चित्रीकरणाच्या स्पॉटवर नागपूरचा रंग•ाूषाकार (मेकअपमॅन) अडकला आहे.रामजी व नकुल श्रीवास बंधू हे नागपुरातील प्रख्यात मेकअप आर्टिस्ट आहेत. नागपूरसह मुंबई व दक्षिण चित्रपट क्षेत्रातून त्यांची मागणी असते. शिवाय, मॉडेलिंगमध्येही मेकअपमॅन म्हणून त्यांना आवर्जुन बोलावले जात असते. या बंधंूपैकी लहान असलेले नकुल हे उत्तराखंड येथील बेरीनाग येथे अडकले आहेत. त्यांच्यासोबत चित्रपटातील तांत्रिक बाजू सां•ााळणारे कलावंतही तेथेच आहेत. असे आठ-दहा जण बेरीनाग येथील एका लॉजवर एकाच रूममध्ये आहेत. विशेष म्हणजे निमार्ताही तेथेच असून, त्याच्याकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे ही संपूर्ण मंडळी सांगत आहे. त्यामुळे, या कलावंतांवर उपासमारीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही मंडळी आपापल्या •ाागातील सहकारी कलावंतांकडून मदत मागून येणारा दिवस काढत आहेत. नकुल यांच्यासह मुंबईची असलेले हे सारे कलावंत लवकरात लवकर आपल्या गृहनगरात परतण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, कुठूनही त्यांना मदत मिळत नसल्याचे दिसून येत आहे.-----------बॉक्स...७ मार्चपासून अडकलोय - नकूल श्रीवास: ७ मार्चपासून तमिळ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मेकअपमॅन म्हणून बेरीनाग येथे संपूण क्रुसोबत आलो. काही दिवस चित्रिकरण सुरू असतानाच २२ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले. तेव्हापासून चित्रपटाचे दिग्दर्शक निशाद •ाारद्वाज व इतर कु्र मेंबर्ससोबत लॉजमध्ये अडकून पडलो आहोत. निमार्ते सिद्धू पुजारी हे सुद्धा येथेच एका हॉटेलमध्ये आहेत. मात्र, ते कोणतही मदत करित नसल्याचे नकुल श्रीवास यांनी सांगितले. अ.•ाा. मराठी चित्रपट महामंडळाकडूनही कुठलेही सहकार्य झाले नाही. चित्रपट मराठी नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही, असे त्यांचे म्हणने आहे. जवळचा पैसा संपला आहे. सगळेच क्रु मेंबर्स एकमेकांच्या आधाराने जगत आहेत. नागपुरातून संजय •ााकरे, आसिफ बक्षी, दीपाली घोंगे, आसावरी रामेकर या सहकारी कलावंतांनी केलेल्या मदतीमुळे थोडा आधार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस