शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

कर्करोग अंत नाही, इच्छाशक्तीने करा मात

By admin | Updated: April 27, 2017 01:54 IST

एरवी चित्रपट कलाकार इमरान हाश्मी याचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ती बिनधास्त, बोल्ड आणि पडद्यावरील

इमरान हाश्मी : मुलाच्या लढ्याने दिली नवी दिशा नागपूर : एरवी चित्रपट कलाकार इमरान हाश्मी याचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ती बिनधास्त, बोल्ड आणि पडद्यावरील ‘किसिंग किंग’ची प्रतिमा. मात्र या बेधडक कलाकारामागे एक हळवा, अभ्यासू, सामाजिक जाणीव असलेला व कर्करोगासारख्या रोगावर मात करणारा लढवय्या मुलाचा कणखर बाप लपला आहे, याची बहुतांश लोकांना जाणीवदेखील नाही. ‘लोकमत’ व ‘कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक जीवन, स्वस्थ जीवन’ या उपक्रमांतर्गत आयोजित परिसंवादादरम्यान इमरानच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू समोर आले. इमरान हाश्मीचा मुलगा अयान याला वयाच्या चौथ्या वर्षी कर्करोग झाला होता. इतक्या लहान वयात पोटच्या मुलाला झालेला हा आजार पाहून हाश्मी दाम्पत्य हादरून गेले होते. मात्र त्यांनी स्वत:ला सावरले व मुलाला या जीवघेण्या आजाराच्या जबड्यातून बाहेर काढले. या प्रवासातून एक गोष्ट निश्चित कळली. कर्करोग हा अंत नाही तर इच्छाशक्तीने त्यावर मात करता येऊ शकते, अशा भावना यावेळी झालेल्या मुलाखतीत इमरानने व्यक्त केल्या. श्वेता शेलगावकर यांनी त्याची मुलाखत घेतली. समुपदेशन अत्यावश्यक अयानला कर्करोग झाल्याचे जगाला का सांगतो, असे माझ्या कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र जागृती निर्माण करणे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटले. रुग्णांवर वैद्यकीय उपचार जितके आवश्यक आहे, तितकेच किंवा त्याहून जास्त समुपदेशन अत्यावश्यक आहे. कुटुंबीयांनी दिलेला आधारदेखील महत्त्वपूर्ण ठरतो. अयानवर उपचार करण्याच्या वेळी कधी ‘आयर्न मॅन’ बनवत असल्याचे सांगितले तर कधी शरीरातील राक्षस बाहेर काढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले होते. रुग्णांशी संवाद साधणे गरजेचे असते. कर्करोगाबाबत अनेक जण बाहेर वाच्यता करण्याचे टाळतात. ही मानसिकता बदलल्या गेली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन इमरान हाश्मीने केले. ‘लोकमत’च्या पुढाकाराचे कौतुक कर्करोगासंदर्भातील जनजागृतीसंदर्भात ‘लोकमत’ने आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. कर्करोगाबाबतची माहिती, कारणे, उपचार यांची माहिती जनतेपर्यंत गेले पाहिजे. अशाप्रकारच्या उपक्रमांची समाजाला आवश्यकता आहे, असे कौतुकोद्गार यावेळी इमरानने काढले.