शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील एक लाख लोकांमध्ये ९१ पुरुषांना कर्करोग; राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचा अभ्यास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 08:45 IST

Nagpur News नागपुरातील एक लाख लोकांमध्ये ९१ पुरुष आणि ९० महिला कर्करोगाने ग्रस्त आहेत. तर, पुण्यात एक लाखामागे ८३, औरंगाबादमध्ये ७० आणि उस्मानाबादमध्ये ४० रुग्णांमध्ये कर्करोग आढळून आल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या अभ्यासातून पुढे आले.

नागपूर : नागपुरातील एक लाख लोकांमध्ये ९१ पुरुष आणि ९० महिला कर्करोगाने ग्रस्त आहेत. तर, पुण्यात एक लाखामागे ८३, औरंगाबादमध्ये ७० आणि उस्मानाबादमध्ये ४० रुग्णांमध्ये कर्करोग आढळून आल्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या अभ्यासातून पुढे आले.

३१ मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर आयोजित सोमवारी पत्रपरिषदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. करतार सिंग, डॉ. बी. के. शर्मा व सचिव अनिल मालवीय यांनी ही माहिती दिली. डॉ. सिंग म्हणाले, २०२१मध्ये हा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आलेल्या ८०६ म्हणजेच ३५.७ टक्के रुग्णांमध्ये तोंडाचा कर्करोग आढळून आला. ३५५ म्हणजे, १७.७ टक्के महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. ३.६ टक्के रुग्णांमध्ये अन्ननलिकेचा, ३.३ टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा, १.२ टक्के रुग्णांमध्ये पोटाचा, ०.८ टक्के रुग्णांमध्ये अस्थिमज्जाचा आणि ०.७ टक्के रुग्णांमध्ये यकृताच्या कर्करोगाचे निदान झाले. केरळ, मिझोराम, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब आणि आसाम या राज्यांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. येथे प्रति लाख लोकसंख्येमध्ये १३० पेक्षा जास्त कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात.

-महाराष्ट्रात २ कोटी २८ लाख लोकांना तंबाखूचे व्यसन

महाराष्ट्रात जवळपास ३१.४ टक्के लोकसंख्या म्हणजे २ कोटी २८ लाख ९९ हजार २७३ लोक तंबाखूचे सेवन करतात. त्यापैकी ३.४ टक्के म्हणजे २८ लाख ४ हजार ३८० लोक सिगारेटचे सेवन करतात. याशिवाय २.७ टक्के म्हणजे २२ लाख २७ हजार ८ लोक विडी, तर २७.६ टक्के म्हणजे २ कोटी २७ लाख ६४ हजार ९९६ लोक तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात.

-कॅन्सरचे रुग्ण दीड ते तीन पटीने वाढले

हॉस्पिटलचे सल्लागार व कॅन्सरतज्ज्ञ डॉ. बी. के. शर्मा यांनी सांगितले, २०२२ मध्ये भारतात सुमारे १९ ते २० लाख कॅन्सरचे रुग्ण आढळून आले. सुमारे दीड ते तीन पटीने रुग्ण वाढल्याचा अंदाज आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी तंबाखू व त्यापासून बनवलेल्या उत्पादनावर पूर्णत: बंदी आवश्यक आहे. ३१ मे रोजी सकाळी ८:३० वाजता जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त हॉस्पिटलतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग