शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रवी राणा यांची निवडणूक रद्द करा : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 22:27 IST

अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांची निवडणूक रद्द करण्यात यावी, अशा विनंतीसह मतदार सुनील खराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देउत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांची निवडणूक रद्द करण्यात यावी, अशा विनंतीसह मतदार सुनील खराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी राणा यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. याचिकेवर ३ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.ऑक्टोबर-२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणा यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदी व भारतीय निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करून विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीमध्ये एक उमेदवार जास्तीतजास्त २८ लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो. परंतु, राणा यांनी या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला. जिल्हा निवडणूक खर्च देखरेख समितीच्या चौकशीमध्ये राणा यांनी खर्चाच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे समितीने राणा यांना नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावले होते. याशिवाय राणा यांनी किराणा सामान वितरित करून मतदारांना स्वत:कडे आकर्षित केले. त्यासाठी त्यांनी स्वाभिमान सहायता कार्ड व कुपन छापले होते. राणा यांना मत देणाऱ्यांना १२ वर्षापर्यंत मोफत किराणा वाटप करण्याचे आश्वासन मतदारांना देण्यात आले होते. त्यासंदर्भात व्हाईस मॅसेज तयार करून ते मोबाईलवर व्हायरल करण्यात आले होते. राणा यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना धमकावून केवळ राणा यांनाच मतदान करायला लावले. अनेक ठिकाणी जात व धर्माच्या नावावर मते मागण्यात आली. यासह विविध बाबी लक्षात घेता राणा यांची निवडणूक रद्द करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. संदीप चोपडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRavi Ranaरवी राणा