शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

औषधांवरील जीएसटी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:58 IST

सर्व औषधे व मेडिकल उपकरणांवर राज्य जीएसटी कर रद्द करण्याच्या मागणीला घेऊन ‘महाराष्ट्र सेल्स अ‍ॅण्ड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज्’ असोसिएशनने विधिमंडळावर मोर्चा काढून आपली मागणी रेटून धरली. विशेष म्हणजे, भरपावसातही मोर्चेकरांनी आपली जागा सोडली नव्हती.

ठळक मुद्दे‘एमएसएमआरए’ची मागणी : औषध प्रतिनिधींनी पावसातही रेटला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व औषधे व मेडिकल उपकरणांवर राज्य जीएसटी कर रद्द करण्याच्या मागणीला घेऊन ‘महाराष्ट्र सेल्स अ‍ॅण्ड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज्’ असोसिएशनने विधिमंडळावर मोर्चा काढून आपली मागणी रेटून धरली. विशेष म्हणजे, भरपावसातही मोर्चेकरांनी आपली जागा सोडली नव्हती.राज्याच्या कानाकोपऱ्यातून वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते. यामुळे एक प्रकारचा लाक्षणिक संप पुकारल्यासारखा होता. असोसिएशनचे महसचिव श्रीकांत फोफसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हज्’कडून तीन ते पाच हजार रुपये घेऊन औषध उद्योगातील आस्थापने भ्रष्ट पद्धतीने औषध विक्रीचे उद्दिष्ट साध्य करण्यास भाग पाडतात. याला विरोध केला तर जबरदस्ती राजीनामा घेतला जातो किंवा दुसऱ्या राज्यात बदली केली जाते. यावर चाप लावण्यासाठी गेल्या हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढला होता. आश्वासने मिळाली. परंतु त्याची पूर्तता झाली नाही, म्हणून पुन्हा हा मोर्चा काढला आहे, असेही फोफसे म्हणाले. विशेष म्हणजे, मोर्चाचे शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन देण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत थांबून होते. आठ तासांच्या कामाची अधिसूचना काढावी,कामाचा पाच दिवसांचा आठवडा करावा, विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्व श्रीकांत फोफसे, विश्वेश्वर स्वामी, दिलीप देशपांडे, एल.आर. राव, विवेक गोडसे, अभय देव, दिनेश यादव, विनोद गुप्ता आदींनी केले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा