शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयात कोरोना उपचाराचा आदेश रद्द करा; राज्य सरकार व मनपाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 20:36 IST

शहरातील १२ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधा, उपकरणे, औषधे व मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. तो आदेश रद्द करण्यात यावा, अशा विनंतीसह धंतोली नागरिक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील १२ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधा, उपकरणे, औषधे व मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. यासंदर्भात २३ एप्रिल रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. तो आदेश रद्द करण्यात यावा, अशा विनंतीसह धंतोली नागरिक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.त्या अर्जावर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकार व महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून अर्जावर ५ मेपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. संबंधित १२ खासगी रुग्णालयांमध्ये धंतोलीतील अवंती इन्स्टिट्यूट आॅफ कार्डिओलॉजीचा समावेश आहे. त्यामुळे अर्जदारांनी वादग्रस्त आदेशावर आक्षेप घेतला आहे. धंतोली घनदाट लोकवस्तीचा परिसर आहे. या ठिकाणी अद्याप एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. अशा लोकवस्त्यांमधील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केल्यास परिसरात कोरोनाचे संक्रमण होईल. आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या वस्त्यांमध्ये हा धोकादायक आजार पसरेल, असे अर्जदारांचे म्हणणे आहे.याशिवाय अर्जदारांनी वादग्रस्त आदेशाच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य सरकारने १४ मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत सक्षम अधिकारी कोरोना प्रतिबंध व नियंत्रणाकरिता कार्य करतील, असे म्हटले आहे. मनपा आयुक्तांचा वादग्रस्त आदेश अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. या आदेशाद्वारे कोरोना रुग्णांच्या उपचाराचा मुद्दा हाताळण्यात आला आहे. त्याचा कोरोना प्रतिबंध व संक्रमण रोखण्याशी संबंध नाही, असे अर्जदारांनी नमूद केले आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेची रुग्णालयेही सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी केली. त्यामुळे न्यायालयाने मनपाला यावरदेखील उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी व अ‍ॅड. अश्विन देशपांडे, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. दीपक ठाकरे तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.केरळ मॉडेलचा अवलंब करणार का?कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार केरळ मॉडेलचा अवलंब करणार का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. तसेच, यावर ५ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात व्यावसायिक सुभाष झंवर यांनी अर्ज दाखल केला आहे. आधी केरळमधील कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त होती. त्यानंतर केरळने प्रभावी उपाययोजना केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. आता महाराष्ट्रात केरळपेक्षा खूप जास्त कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे केरळ मॉडेलची माहिती न्यायालयात सादर करण्यात यावी व महाराष्ट्र सरकारने या मॉडेलचा अवलंब करावा, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदारातर्फे अ‍ॅड. राम हेडा यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :Courtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस