शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव प्राण्यांवर कर लावता येऊ शकतो काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:48 IST

बेवारस प्राण्यांच्या नियंत्रणावर होणारा खर्च भागविण्यासाठी पाळीव प्राण्यांवर कर आकारला जाऊ शकतो काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी उपस्थित करून महापालिकेला यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : मनपाला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेवारस प्राण्यांच्या नियंत्रणावर होणारा खर्च भागविण्यासाठी पाळीव प्राण्यांवर कर आकारला जाऊ शकतो काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी उपस्थित करून महापालिकेला यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.बेवारस प्राण्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर अंकिता शाह यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, शाह यांनी भांडेवाडी येथील प्राण्यांच्या शेल्टर होमच्या दुरवस्थेकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. शेल्टर होममध्ये प्राण्यांसाठी आवश्यक सुविधा नाहीत. प्राण्यांची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे शेल्टर होम बंद करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांच्या याचिकेत बेवारस कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. बेवारस कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु, सध्या नसबंदी कार्यक्रम बंद आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. बेवारस कुत्री नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. चावा घेणे, गाडीच्या मागे धावणे, अंगावर भुंकणे इत्यादी प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गाडीच्या मागे कुत्री धावल्यामुळे आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, असा दावा शाह यांनी केला आहे. ही बाब लक्षात घेता, न्यायालयाने पाळीव प्राण्यांचा विषय उपस्थित केला व पाळीव प्राण्यांवर कर आकारला जाऊ शकतो काय, अशी विचारणा मनपाला केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdogकुत्रा