शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पस क्लब हाऊसफुल्ल

By admin | Updated: August 18, 2014 00:31 IST

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमतने खास ‘कॅम्पस क्लब’ हे अभियान सुरू केले आहे. कॅम्पस क्लबच्या सदस्यता नोंदणीचा आजपासून शुभारंभ झाला आणि पहिल्याच दिवशी बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सदस्यता नोंदणी : बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमतने खास ‘कॅम्पस क्लब’ हे अभियान सुरू केले आहे. कॅम्पस क्लबच्या सदस्यता नोंदणीचा आजपासून शुभारंभ झाला आणि पहिल्याच दिवशी बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अविरत आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या बालविकास मंचचे जुने नाते आता ‘कॅम्पस क्लब’ या नव्या स्वरूपाद्वारे लोकमतने जोडले आहे. लोकमत कॅम्पस क्लबमध्ये ५ ते १५ वर्षापर्यंत बालकांचा समावेश आहे. मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी, त्यांना सर्वगुणसंपन्न करण्यासाठी या क्लबमध्ये विविध प्रशिक्षण कार्यक्रम, सहल, शारीरिकदृष्ट्या साहसाचे उपक्रम, सांस्कृतिक स्पर्धा आदी कार्यक्रमाचे यात आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याकरिता आज सकाळपासून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत लोकमत भवनापुढे गर्दी केली होती. सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ बिल्डर्स व डेव्हलपर्स सतीश मोहोड, स्नेह कोचिंग क्लासेसचे संचालक रजनीकांत बोंद्रे, सीईओ शाम शेंद्रे यांच्याहस्ते झाला. सदस्यता नोंदणी अभियान शहरातील सहा केंद्रावर आयोजित करण्यात आले होते. सर्वच केंद्रावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकली नाही. परिणामी पालकांकडून मागणी झाल्याने, सदस्यता नोंदणीचा कार्यक्रम पुढेही सुरू राहणार आहे. बालकांना सदस्यता नोंदणीबरोबर भरपूर बक्षिसेही देण्यात आली. मुलांना राज्यस्तरीय लकी ड्रॉ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. ‘ज्ञानगंगा’ योजनेच्या माध्यमातून सहभागी झालेल्या बालकांना लॅपटॉपसह हॅण्डीकॅम कॅमेरा, प्ले स्टेशन, बीन बॅग, सायकल, कॅसीओ, आय पॉड, डीव्हीडी प्लेअर, वॉच, बॅगसह १०१ उत्तेजनार्थ भेटवस्तू बक्षिसात मिळणार आहे. यंदाचे ‘कॅम्पस क्लब’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर ‘डीआयडी लिटील मास्टर फेम’ तनय मल्हार, ‘सारेगम’फेम आनंदी जोशी आहेत. ‘कॅम्पस क्लब’च्या सदस्यत्वासाठी शुल्क १५० रुपये ठेवण्यात आहे. सदस्य झालेल्या प्रत्येकाला नोंदणी करताच वॉटर बॉटल, स्टोरी बुक, नमकीन, डायमंड नमकीन, दिनशॉज आईक्रिमचे कूपन, वाघमारे मिरची पावडर, सावजी मॅजिक मिक्स मसाला व सावजी मसाला, खिंडसी वॉटर पार्कचे कूपन, बॉयझोन हेअर कट कूपन व आकर्षक ओळखपत्र मिळेल. सदस्य नोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत कॅम्पस क्लब, लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, वर्धा रोड, नागपूर येथे दूरध्वनी क्रमांक २४२९३५५ व मोबाईल क्रमांक ९८२२४०६५६२, ९५५२५५६८३२, ९९२२९६८५२६, ९९२२२०००६३, ९९२२९१५०३५ या क्रमांकावर संपर्क करावा. (प्रतिनिधी)