शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोनाच्या सावटात नळकनेक्शन कापण्याची मोहीम,लोकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 20:44 IST

थकबाकी वसुलीच्या नावाखाली मनपाच्या जलप्रदाय विभागाने नळकनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी जुनी फुटाळा वस्ती परिसरात जलप्रदाय विभागाचे पथक नळकनेक्शन तोडण्यासाठी गेले असता संतप्त नागरिकांच्या जमावाने कारवाईला विरोध केला.

ठळक मुद्देफुटाळ तलाव स्लम येथील म्हाडाच्या ४६६ गाळेधारकांचे कनेक्शन कापले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे सांगितले आहे तर महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा, असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे थकबाकी वसुलीच्या नावाखाली मनपाच्या जलप्रदाय विभागाने नळकनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी जुनी फुटाळा वस्ती परिसरात जलप्रदाय विभागाचे पथक नळकनेक्शन तोडण्यासाठी गेले असता संतप्त नागरिकांच्या जमावाने कारवाईला विरोध केला. यामुळे पथकाला माघारी जावे लागले.जुनी फुटाळा वस्ती हा परिसर स्लम भागात असूनही येथील रहिवाशांना हजारो रुपयांचे पाणी बिल पाठविण्यात आले आहे. २०० ते ३०० लोकांची ही तक्रार आहे. स्लम भाग असूनही काही लोकांना ३० ते ४० हजाराचे बिल आले आहे. बिल अधिक आल्याने बहुसंख्य लोकांनी ते भरले नाही. त्यामुळे जलप्रदाय विभागाने नळकनेक्शन तोडण्यासाठी पथक पाठविले. यामुळे वस्तीतील नागरिक संतप्त झाले. महिला व नागरिकांचा जमाव जमला. या घटनेची माहिती मिळताच आमदार विकास ठाकरे घटनास्थळी पोहचले. येथील नागरिकांची समस्या जाणून घेतली. धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांना जादा बिलासंदर्भात विचारणा केली. देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असताना मनपाची नळतोडण्याची मोहीम सुरू असल्याबाबत अधिकाऱ्यांना ठाकरे यांनी जाब विचारला. ग्राहकांच्या तक्रारी जाणून घ्या, रीतसर बिल पाठविण्यास अधिकाऱ्यांना बजावले. त्यानंतर मनपाचे पथक माघारी फिरले. जमावबंदी असताना बंदोबस्तात नळतोडण्याच्या कारवाईमुळे जमाव जमल्याची माहिती मिळाल्याने अंबाझरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारीही घटनास्थळी आले होते.४६६ गाळेधारकांचे कनेक्शन कापलेथकबाकी न भरल्याने जलप्रदाय विभागाच्या म्हाडाच्या १७ कॉलनीतील पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. रामबाग व रघुजीनगर येथील कॉलनीचे कनेक्शन कापल्याने हजारो गाळेधारकांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. गुरुवारी मोठा ताजबाग ते वांजारीनगर दरम्यानच्या म्हाडा क्वॉर्टरमधील ४६६ गाळेधारकांचा पाणीपुरवठा खंडित केला. जलप्रदाय विभागाचे अधिकारी आयुक्त तुकाराम मुुंढे यांचा धाक दाखवून पाणी कनेक्शन कापत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. नावाने कनेक्शन नसल्याने गाळेधारकांना पाणी बिल भरता येत नाही. वैयक्तिक नळ कनेक्शन देण्याची मागणी करूनही मिळत नसल्याचा येथील रहिवाशांचा आरोप आहे.जमावबंदी असताना म्हाडा क्वॉर्टरमधील मनपाची कारवाईच चुकीची आहे. आयुक्तांचा धाक दाखवून ही कारवाई केली जात आहे. येथील नागरिकांनी वैयक्तिक नळजोडणीची वारंवार मागणी केली आहे. परंतु महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असताना पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई चुकीची असल्याचे प्रभागाचे नगरसेवक सतीश होले यांनी सांगितले. दरम्यान रामबाग व रघुजीनगर येथील गाळेधारकांनी आमदार विकास ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी