शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घरगडी म्हणून आला, आता अधिकारी झाला; संघर्ष, जिद्द आणि चिकाटीचा परिपाक

By मंगेश व्यवहारे | Updated: November 9, 2023 12:08 IST

राम बिहारी आई-वडिलांना एकुलता एक. गुरे राखत त्याने गावात पाचवीपर्यंत शिक्षण घेतले.

नागपूर : वयाच्या अकराव्या वर्षी आई-वडिलांना सोडून तो नागपुरात एका कुटुंबाकडे घरगडी म्हणून आला. येथे निष्ठेने घरकाम करत उच्चशिक्षण घेतले. पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी केली अन् आता बिहार सरकारमध्ये ब्लॉक पंचायत राज अधिकारी होऊन त्याने आपल्या संघर्षाची चमक दाखविली. या युवकाचे नाव आहे राम बिहारी देवेंद्र झा. तो मूळचा बिहारमधील भानपूर (जि. समस्तीपूर) येथील आहे.  

राम बिहारी आई-वडिलांना एकुलता एक. गुरे राखत त्याने गावात पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. त्याच्या परिचयातील एका वयोवृद्ध महिलेला केअर टेकरची गरज होती. त्यामुळे वडिलांनी अकराव्या वर्षी बेगुसराय येथे पाठविले. पुढे २०१० मध्ये त्या महिलेला नागपुरात उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्यासोबत राम बिहारीही आला. वयोवृद्ध महिलेच्या नातेवाइकांनी राम बिहारीला पंडित नेहरू विद्यालयात प्रवेश घेऊन दिला. पुढे महिलेचा मृत्यू झाला. कुटुंब प्रमुखाचीही बदली झाली. राम बिहारी घराचा केअर टेकर म्हणून येथेच थांबला. दहावी, बारावी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होत पुढे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून त्याने बीएस्सी केली. नागपूरकरांनी दिला आधार  तो केअर टेकर होता ते घर त्याला २०२० मध्ये सोडावे लागले. आर्थिक अडचणी वाढल्या, पण नागपूरकर मित्र आणि शिक्षक मदतीला आले. मित्रांकडे तो चार महिने नि:शुल्क राहिला.शिक्षणासाठी पैशाची अडचण येतच होती. अशावेळी ओळखीतील अनेक जण मदतीचा हात पुढे करायचे. याच प्रवासात त्याला त्याची अर्धा एकर शेतीही विकावी लागली. 

टॅग्स :nagpurनागपूर