शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनानंतर दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:21 IST

हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसाच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदे ही फक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनाच दिली जातील.

ठळक मुद्देबंदद्वार बैठकीत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना केले आश्वस्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसाच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदे ही फक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनाच दिली जातील. इतरांचा विचार होणार नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलासा दिला.शरद पवार मंगळवारी दुपारी नागपुरात दाखल झाले. सायंकाळी त्यांनी प्रेस क्लबमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बंदद्वार बैठक घेतली. बैठकीला मंत्री व आमदारांशिवाय मोजक्याच पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला. बैठकीत पवार यांनी आमदारांची वेगवेगळ्या विषयावरील मते ऐकून घेतली. मंत्रिमंडळ विस्तार लवकर व्हावा, अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली. यावर शरद पवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारासाठी काँग्रेसकडून त्यांची नावे निश्चित करण्यासाठी वेळ लागू शकतो. कारण त्यांच्याकडे हायकमांड पद्धत आहे. दिल्लीतून नावे निश्चित होतात. काँग्रेसमध्ये एक गट ज्येष्ठांना आता बाजूला सारून तरुणांना संधी देण्याची मागणी करीत आहे तर ज्येष्ठ म्हणत आहेत की ही आमची शेवटची संधी असल्याचे सांगत आपला दावा सादर करीत आहेत. त्यामुळे त्यांना वेळ लागू शकतो. राष्ट्रवादी व शिवसेनेचे निर्णय स्थानिक पातळीवर होतात. काँग्रेसला वेळ लागला तरी अधिवेशनानंतर दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे त्यांनी आश्वस्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अधिवेशनानंतर दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीवरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.पवारांचा सल्ला, लोकांच्या संपर्कात रहाबैठकीत शरद पवारांनी आमदारांचे प्रश्न ऐकून घेत त्यांना लोकांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला. मतदारसंघात फिरा. जास्तीत जास्त नागरिकांना भेटा, त्यांचे प्रश्न सोडवा, अशी सूचनाही त्यांनी आमदारांना केली.कर्जमाफी दोन टप्प्यातकर्जमाफी देणार यावर सरकार ठाम आहे. त्यासाठी तयारी झाली आहे. प्रसंगी कर्ज घेण्याचीही तयारी आहे. विरोधकांच्या दबावाला सरकार बळी पडणार नाही. अभ्यास सुरू आहे. बँकांकडे माहिती मागविण्यात आली आहे. हे आर्थिक वर्ष संपताना व नवे आर्थिक वर्ष सुरू होताना दोन टप्प्यात कजंमाफीकरण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंबंधीची तरतूद केली जाईल, अशी माहितीही बैठकीत आमदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.रेल्वे स्टेशनला गोडसेचे नाव देण्यास विरोधउत्तर प्रदेशच्या एका रेल्वे स्टेशनला नाथूराम गोडसेचे नाव देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला पुढाकार निंदनीय आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याचे नाव जर एखाद्या स्टेशनला दिले जात असेल तर जनता देशातून भाजपचे नाव मिटविल्याशिवाय राहणार नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार