शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

देना बँकेतील गोलमालाचे सीए कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 10:41 IST

सरकारी व खासगी बँकांना चुना लावणाऱ्या टोळीचे सूत्रधार सीए बंधू व त्यांच्या टोळीत सहभागी साथीदारांनी आतापर्यंत किमान १००० कोटी रुपयांचे कर्ज व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देबोगस कागदपत्रांचा वापर सीए बंधूंनी व्यापाऱ्यांना मिळवून दिले १००० कोटींचे कर्ज

जगदीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी व खासगी बँकांना चुना लावणाऱ्या टोळीचे सूत्रधार सीए बंधू व त्यांच्या टोळीत सहभागी साथीदारांनी आतापर्यंत किमान १००० कोटी रुपयांचे कर्ज व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूरसह अन्य शहरांमध्ये पसरलेल्या या टोळीची गंभीरतेने चौकशी केल्यास सरकारी अधिकारी व उद्योजकांसह अनेकांवर कारागृहात जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास एजन्सीकडून या प्रकरणाची चौकशी केल्यास सीए व त्यांच्या टोळीची माहिती पुढे येऊ शकते.नुकतेच गुन्हे शाखा पोलिसांनी देना बँकेशी फसवणूक झाल्याचे दोन प्रकरण नोंदविले आहे. यात सीएसह १८ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी बोगस कागदपत्रांद्वारे कर्ज व सीसी लिमिट मिळवून बँकेला ५.५ कोटी रुपयांनी फसविले आहे. पोलिसांनी १९ प्रकरणांत १०० कोटीची फसवणूक झाल्याचे सांगितले आहे. त्यापैकी दोन प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंतच्या तपासात सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) व बँकेच्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून आले आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात या टोळीत शहरातील सीए बंधूंची महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती मिळाली आहे. सीएच्या मदतीने खासगी व सरकारी बँकेतून किमान एक हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याची माहिती आहे. सूत्रांच्या मते, ते गेल्या १५ वर्षांपासून व्यवसायात आहेत. सरकारी व खासगी बँकेत त्यांनी आपली चांगली पत बनविली आहे. बँकेतून कर्ज घेऊन ते बुडविण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या तोंडावर या सीए बंधूंचे नाव आहे.त्यांच्याकडे बँकेला बुडविणारेच ग्राहक येतात. त्यांच्या कामाची पद्धत पूर्णपणे व्यावसायिक आहे. ते १० ते २० टक्के कमिशन वसूल करतात. त्या मोबदल्यात कागदपत्र बनविणे, प्रस्ताव तयार करणे, मंजुरी मिळविणे आदी कामे करवून देतात. त्यांच्या इशाºयावर बँकेचे अधिकारीसुद्धा काम करतात. खानापूर्तीसाठी कर्जाची कागदपत्रे व गहाण संपत्तीची चौकशी केली जाते. बँक अधिकारी कमी वेळात कर्ज उपलब्ध करून देतात. बँकेद्वारे कर्ज मिळताच, सीए बंधूंना त्यांचे कमिशन ग्राहकाकडून प्राप्त होते. ठरलेल्या योजनेनुसार कर्जाचे तीन हप्ते न भरल्यास संबंधित खाते एनपीए (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स) होऊन जाते. त्यानंतर बँक अधिकारी ग्राहकावर कर्जाच्या वसुलीसाठी दबाव टाकतात. सीए बंधू पुन्हा बँकेच्या अधिकाऱ्यांशी साठगाठ करून, मूळ कर्जाच्या रकमेच्या ४० ते ५० टक्के रक्कम परत करण्यासाठी तडजोड करतात. या तडजोडीचे कमिशनसुद्धा १० ते २० टक्के असते.अशा पद्धतीने कर्ज देणे व तडजोड करीत असल्याने सीए बंधू व त्यांचे सहकारी मालामाल झाले आहेत. बोगस कागदपत्रे व आपल्या संपर्काचा वापर करून त्यांनी गेल्या ८ ते १० वर्षात व्यापाऱ्यांना किमान एक हजार कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे.सीए बंधूंचे ग्राहक नेहमीच डिफॉल्टर होत असल्याने संबंधित बँकेचे वरिष्ठ अधिकारी सतर्क झाले. अधिकाऱ्यांनी सीएकडून आलेल्या प्रकरणांची गंभीरतेने चौकशी करण्याचे निर्देश दिले. याची माहिती सीए बंधूंना मिळाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या सीएकडून बँकेत कर्जाचे प्रस्ताव पाठविले होते. त्यांनी चार-पाच सीएना सोबत घेतले होते.रोख घेतले गेले कमिशनसीए बंधू व त्यांचे सहकारी कमिशनची रक्कम रोख घेत होते. सूत्रांची माहिती आहे की, कर्जधारकांना रक्कम आवंटीत झाल्यानंतर ते तत्काळ बँकेतून रोख काढत होते. या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केल्यास सीए बंधूंची पोलखोल होणार आहे. त्यांच्या फसवेगिरीची संपूर्ण माहिती कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना माहीत आहे. एक कर्मचारी त्यांचा सहायक आहे तर दुसरा ग्राहकांकडून कमिशन वसूल करून, त्याला योग्य ठिकाणी पोहोचविण्याचे काम करतो.

टॅग्स :bankबँक