शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

घर खरेदी आणखी स्वस्त होणार! मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 19:56 IST

मुद्रांक शुल्कात सवलत देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे घर खरेदी स्वस्त होऊन बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. शिवाय अप्रत्यक्षरीत्या अन्य क्षेत्रालाही लाभ मिळणार असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराज्य शासनाचा निर्णय, थेट ग्राहकांना लाभ, बांधकाम क्षेत्राला चालना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुद्रांक शुल्कात सवलत देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे घर खरेदी स्वस्त होऊन बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. शिवाय अप्रत्यक्षरीत्या अन्य क्षेत्रालाही लाभ मिळणार असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.कोरोना महामारीमुळे चार महिन्यात मुद्रांक शुल्क स्वरुपात राज्य शासनाला कमी महसूल मिळाला होता. खरेदीदारांना फायदा आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेत १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी ३ टक्के आणि १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत २ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. पूूर्वी नागपूर शहरासाठी ६ टक्के आणि ग्रामीण क्षेत्रासाठी ५ टक्के मुद्रांक शुल्क होते. पण उपरोक्त कालावधीत शहरासाठी ३ टक्के आणि ग्रामीणकरिता २ टक्के मुद्रांक शुल्क लागणार आहे. क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष महेश साधवानी म्हणाले, राज्य शासनाने अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेतला असून स्वागतार्थ आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला बूस्ट आणि खरेदीला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे इतरही व्यवसायाला चालना मिळेल. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उदाहरण देताना साधवानी म्हणाले, फ्लॅट २० लाखांचा असेल तर पूर्वीच्या १.२० लाखांच्या तुलनेत उपरोक्त कालावधीत ग्राहकांना ६० हजार मुद्रांक शुल्क भरावे लागेल. हीच बाब जास्त किमतीच्या फ्लॅटसाठीही लागू होणार आहे.नंतर पेजशनकरिता ‘अ‍ॅग्रीमेंट टू सेल’ची सोयसाधवानी म्हणाले, ही सवलत विशिष्ट कालवधीसाठी असल्याने रेडी पजेशन फ्लॅट घेणाऱ्यांना फायदा तर होईलच, तसेचज्या ग्राहकांना दोन वर्षानंतर फ्लॅटचा ताबा मिळत असेल त्यांना ‘अ‍ॅग्रीमेंट टू सेल करून सवलतीचा फायदा घेता येईल.नागपुंरात गेल्या काही दिवसांपासून घर खरेदीकडे लोकांचा ओढा वाढला आहे. बँकांचे गृहकर्जासाठी कमी झालेले व्याजदर, पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी २.६७ लाखांपर्यंत सवलत आणि आता मुद्रांत शुल्कात ३ टक्के सवलत दिल्याने घर खरेदी स्वस्त होणार असून बांधकाम क्षेत्राला बूस्ट मिळेल. नागपूर शहरात जवळपास ३ हजार रेडी पजेशन फ्लॅट आणि इतर घरकुल उपलब्ध आहेत. त्याच्या विक्रीला चालना मिळणार असल्याचे साधवानी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nagpurनागपूर