शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जैविक कचरा खरेदी करणाऱ्याला पकडले

By admin | Updated: May 17, 2017 01:59 IST

मेडिकलमधून निघणारा रोजचा जैविक कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) तीन हजार रुपयात विकत घेऊन भंगारात विकणाऱ्या

रोजची उलाढाल तीन हजार रुपयांची : मेडिकलचा घातक जैविक कचरा भंगारात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेडिकलमधून निघणारा रोजचा जैविक कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) तीन हजार रुपयात विकत घेऊन भंगारात विकणाऱ्या एका इसमाला मेडिकलच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडून अजनी पोलीस ठाण्याच्या हवाली केले, विशेष म्हणजे, जैविक कचऱ्याची विक्री करणारे दुसरे-तिसरे कोणी नसून ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’चे कर्मचारी निघाल्याने खळबळ उडाली आहे. ‘लोकमत’ने १६ मेच्या अंकात ‘मेडिकलचा घातक जैविक कचरा भंगारात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची गंभीर दखल मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक विभागाने घेतली. मंगळवारी सकाळपासून जैविक कचऱ्याच्या संकलनावर विशेष पाळत ठेवून विक्री आणि खरेदी करणाऱ्यांनाच ताब्यात घेतले. रुग्णाशी संपर्कात आलेल्या आणि उपचार करताना वापरलेली प्रत्येक वस्तू ‘बायो-मेडिकल वेस्ट’ (जैविक कचरा) मध्ये मोडते. हा घातक कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्याचा नियम आहे. सार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी ‘बायो मेडिकल वेस्ट हॅण्डलिंग रुल्स’ अर्थात जैविक वैद्यकीय कचरा हाताळणी नियमावली आहे. मेडिकलमधून निघणाऱ्या रोजच्या जैविक कचऱ्याच्या विघटनाचे कंत्राट ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’ला देण्यात आले आहे. परंतु हा कचरा विघटनला जाण्यापूर्वीच भंगार विक्रेत्यांकडे पोहचत असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. वृत्ताची दखल मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक विभागातील चमूने घेतली. एक डॉक्टर व दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने सकाळपासून जैविक कचऱ्याच्या संकलनावर पाळत ठेवली. हा कचरा हाताळणारे ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’चे दोन कर्मचारी ‘आकाश’ नावाच्या युवकाला हा कचरा विकत असल्याचे लक्षात येताच या चमूने त्याला रंगेहात पकडले. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या समोर त्याला उभे केल्यानंतर अजनी पोलीस ठाण्याच्या हवाली केले. सूत्रानुसार, रंगेहात पकडण्यात आलेली ‘आकाश’ नावाची व्यक्ती, ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’च्या कर्मचाऱ्यांना रोज तीन हजार रुपये देऊन रुग्णाच्या वापरात आलेले इंजेक्शन, आयव्ही बॉटल, रबरी नळ्या, ग्लोव्हज व इतरही साहित्य विकत घेऊन दुप्पट भावात भंगारात विकत असल्याची माहिती आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी गंभीर होणार? जैविक कचरा हाताळणी नियमावलीचे पालन केले जाते की नाही, याची जबाबदारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळावर आहे. मात्र, मंगळवारी या मंडळाचा एकही अधिकारी मेडिकलच्या घटनास्थळी आला नाही. मेडिकल रुग्णालयाचे ‘बायो-मेडिकल वेस्ट’ रोज उघड्यावर जमा केले जात असताना व भंगारात याची विक्री होत असताना याचे गांभीर्य त्यांना दिसून आले नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. थेट वाहनात कचरा जैविक कचऱ्याची उचल करणाऱ्या एका इसमाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सोबतच ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’ला थेट वाहनात कचरा जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत. -डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल