शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

नागपुरात व्यावसायिक स्पर्धेतून केले तरुणाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 2:08 PM

व्यावसायिक स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादात पाच आरोपींनी मानेवाडा चौकातून एका तरुणाचे अपहरण केले. त्याला भांडेवाडी येथील गोदामात नेऊन लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देभांडेवाडीत नेऊन मारहाण : हुडकेश्वरमधील घटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : व्यावसायिक स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादात पाच आरोपींनी मानेवाडा चौकातून एका तरुणाचे अपहरण केले. त्याला भांडेवाडी येथील गोदामात नेऊन लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.राजेश तिवारी (३०, रा. मानेवाडा) असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. तो पीओपीचे काम करतो. तेच काम निजाम खान नामक आरोपीही करतो. प्रारंभी राजेश व निजाम खान हे दोघेही पीओपीचा व्यवसाय सोबत करायचे. त्यांच्यात एकमेकांचे लेबर पळवून नेण्यावरून वितुष्ट आले. नंतर वाद वाढतच गेला. शिवीगाळ धमक्या वाढल्या. अनेकदा दोघे हमरीतुमरीवरही आले. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सकाळी राजेश कामावर जाण्याकरिता घरून निघाला. आरोपी निजाम तसेच मुन्ना, छोटकन व इतर दोन आरोपी त्याच्या मागावरच होते. त्यांनी मानेवाडा चौकात राजेशला आपल्या इनोव्हा कारमध्ये ओढले. यापूर्वी नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात समेट करू, असा बहाणा करून त्याला भांडेवाडी येथील आपल्या गोदामात नेले. तेथे त्याला आरोपींनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. राजेशने प्रसंगावधान राखत हातपाय जोडून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपींनी त्याच्याकडील दागिने व रोख रकम जबरीने हिसकावून घेतल्याचे तक्रारीत नमूद केले.सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी निजाम हा पूर्वी एका राष्ट्रीय पक्षाचा शाखा उपाध्यक्ष होता. सध्या तो जनसुराज्य पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगतो. त्याच्या इनोव्हा कारवर तसा उल्लेख असल्याची माहिती आहे.यापूर्वी झाला वादत्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी मोबाईल फोनवरून एकामेकाला पाहून घेण्याची धमकी दिली होती. निजाम खान याने नंदनवन पोलिसात त्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी तिची अदाखलपात्र नोंद केली होती. त्यामुळे वाद धुमसतच गेला अन् आज अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली. यासंबंधाने वारंवार संपर्क करूनही उशिरा रात्रीपर्यंत पोलिसांकडून माहिती मिळाली नाही.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसKidnappingअपहरण