शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नागपुरात व्यावसायिकाला चार कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 1:05 AM

टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात बक्कळ नफा मिळतो, असे सांगून एका व्यावसायिकाकडून पाच कोटी रुपये गुंतवून घेतल्यानंतर टूर प्लॅनर आणि त्याच्या परिवारातील सदस्यांनी संबंधित व्यावसायिकाचा विश्वासघात केला.

ठळक मुद्देटूर प्लॅनरचे कटकारस्थान : एकाच परिवारातील पाच जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात बक्कळ नफा मिळतो, असे सांगून एका व्यावसायिकाकडून पाच कोटी रुपये गुंतवून घेतल्यानंतर टूर प्लॅनर आणि त्याच्या परिवारातील सदस्यांनी संबंधित व्यावसायिकाचा विश्वासघात केला. संदीप परमानंद अग्रवाल (वय ४६), असे या प्रकरणातील फसगत झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी आपल्याला चार कोटींचा गंडा घातल्याची तक्रार केल्यामुळे नंदनवन पोलिसांनी गोकुळपेठेतील टूर प्लॅनर देवेंद्र गोविंद गोयल, निकिता देवेंद्र गोयल, रितेश गोविंद गोयल, गोविंद मुरालीलाल गोयल आणि अनिता गोविंद गोयल (सर्व रा. ४६०, गोविंद भवन, गोकुळपेठ) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.वर्धमाननगरात राहणारे व्यावसायिक संदीप अग्रवाल यांची आर्थिक समृद्धी बघता आरोपी गोयल परिवारातील सदस्यांनी तीन वर्षांपूर्वी त्यांच्याशी सलगी वाढवली. त्यांच्यासोबत घरगुती संबंध प्रस्थापित केल्यानंतर, त्यांना २०१६ मध्ये फॅमिली टूरचे आयोजन करून दुबईला नेले. टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात मोठा नफा आहे, असे सांगून त्यांना फॉरेन एक्सचेंज लिमिटेडचे लायसन्स दाखविले. वर्षाला मोठा नफा मिळवून देतो, अशी थाप मारून गोयल कुटुंबीयांनी अग्रवाल यांना या व्यवसायात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार, १० आॅगस्ट २०१६ ते १४ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत अग्रवाल यांनी आरोपी गोयल कुटुंबीयांकडे ४ कोटी ९९ लाख रुपये आरटीजीएसमार्फत दिले. त्यातील केवळ २ कोटी ३१ लाख ४७ हजार रुपये आरोपींनी अग्रवाल यांना परत केले. उर्वरित २ कोटी ६७ लाख ५२ हजार आणि व्यवसायात झालेल्या नफ्याचे १ कोटी २३ लाख १९ हजार असे सुमारे ३ कोटी ९० लाख रुपये आरोपींनी हडपले. वारंवार मागणी करूनही आरोपी गोयल कुटुंबीय रक्कम देत नसल्याचे पाहून अग्रवाल यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.वरिष्ठ पातळीवरून तपासगुन्ह्यातील तक्रारदार, आरोपी आणि रक्कम बघता या प्रकरणाचा वरिष्ठ पातळीवरून तपास झाला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा प्रदीर्घ तपास केला. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीbusinessव्यवसाय