शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरच्या भूमिकेमुळे व्यापाऱ्यात असंतोष

By admin | Updated: August 30, 2015 02:54 IST

सीताबर्डीतील रोड वायडनिंग अ‍ॅन्ड बुटी महल स्ट्रीट स्कीम अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामस्थळी बिल्डरने (विकासक)

मारहाण, तोडफोड सीताबर्डीत तणावपूर्ण स्थिती कोणत्याही क्षणी भडका उडण्याची भीतीनागपूर : सीताबर्डीतील रोड वायडनिंग अ‍ॅन्ड बुटी महल स्ट्रीट स्कीम अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामस्थळी बिल्डरने (विकासक) घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे व्यापारी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी हाणामारी आणि दगडफेकीचीही घटना घडली. लगेच हा वाद निकाली न काढला गेल्यास येथे कोणतीही मोठी घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सीताबर्डीतील नागपूर सुधार प्रन्यासच्या अभ्यंकर मार्गावरील वायडनिंग अ‍ॅन्ड बुटी महल स्ट्रीट स्कीम अंतर्गत १ लाख, १४ हजार, ७९. ३६ चौरस फूट पुनर्गठित भूखंड बुटी कुटुंबीयांना मिळाला आहे. या जागेची लीज बुटी कुटुंबीयांनी गोयल गंगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना पंजिकृत करून दिली आहे. तेथे गोयल गंगातर्फे बिल्डर आणि त्यांच्या साथीदारांनी खोदकाम, तोडफोड आणि बांधकाम हाती घेतले आहे. दुसरीकडे ५० ते ९० वर्षांपासून या जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. या बांधकामामुळे आपली मोक्याची जागा जाईल. चांगला व्यवसाय बुडेल आणि होत्याचे नव्हते होईल, अशी भीती व्यापाऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे आपल्या जागेची निश्चिती व्हावी, आपल्याला आधी व्यवस्थित जागा मिळावी आणि नंतरच विकासकाने काम करावे, अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे. विकासाला आमचा विरोध नाही. पाठिंबाच आहे. मात्र, हा विकास करताना कोणत्याही व्यापाऱ्याच्या रोजीरोटीवर गदा येऊ नये, कुणाचा व्यवसाय उद्ध्वस्त केला जाऊ नये, अशी भूमिका घेऊन व्यापारी आपली मागणी रेटत आहे. विकासकाकडून त्याला दाद मिळत नसल्यामुळे व्यापारी वर्गात रोष आहे. नासुप्र, महापालिकेकडूनही साथ मिळत नसल्याची व्यापाऱ्यांची भावना आहे. त्यामुळे पोलीस ठाणे आणि कोर्टातून न्याय मिळवण्याचे व्यापाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)‘जैसे थे‘चे आदेशया पार्श्वभूमीवर, व्यापाऱ्यांनी कोर्टात धाव घेऊन कोर्टाकडून ‘जैसे थे‘चे आदेश मिळवले आहे. मात्र, ते दुर्लक्षित करून बिल्डर बाउन्सर आणि गुंडांना उभे करून व्यापाऱ्यांची दुकाने फोडत करीत आहे. शुक्रवारी दुपारी असाच प्रकार झाला. तोडफोड होत असल्याचे पाहून व्यापारी विमलकुमार जैन यांनी बिल्डर अनुप खंडेलवाल आणि त्यांच्या साथीदारांना रोखण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे बिल्डर आणि त्याच्या साथीदारांनी आपल्याला मारहाण करून दुकान तोडण्याची तसेच बरबाद करण्याची धमकी दिल्याची तक्रार जैन यांनी सीताबर्डी ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी खंडेलवाल यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. व्यवसाय कसा वाचवायचादरम्यान, बिल्डर खंडेलवाल यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे व्यापारी वर्गात तीव्र रोष निर्माण झाला असून, कशा पद्धतीने आपले दुकान आणि व्यवसाय वाचवायचा, या प्रश्नाने सीताबर्डीतील अनेक व्यापारी चिंताग्रस्त आहे. कायदेशीर मार्ग अवलंबूनही बिल्डर अथवा प्रशासनाकडून दाद मिळत नसल्यामुळे व्यापाऱ्यांच्या रोषाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.