लाेकमत न्यूज नेटवर्क
पचखेडी : कुही तालुक्यातील अडम, माजरी व नवेगाव (देवी) शिवारात असलेल्या विजेच्या ट्रान्सफार्मरच्या पेट्या २४ तास उघड्या राहत असून, या पेट्यांच्या जवळ गुरांचा वावर असताे. या पेट्यांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित हाेऊन गुरांचा मृत्यू हाेण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या पेट्या धाेकादायक ठरत आहेत. या गंभीर प्रकाराकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आराेप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.
उन्हाळा सुरू झाल्याने गुरांना पिण्याच्या पाण्याचे व चाऱ्याचे दुर्भिक्ष्य जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जनावरे चारा व पाण्याच्या शाेधात शेतात फिरत असतात. दुसरीकडे, या भागातील नवेगाव (देवी), अडम, माजरी, खेंडा, कुजबा या शिवारातील राेडलगत असलेल्या विजेच्या ट्रान्सफार्मरच्या पेट्या सतत उघड्याच असतात. या शिवारात तसेच राेडलगत शेतकऱ्यांची जनावरे चारा खात फिरत असतात. फिरताना त्यांना जाेरात विजेचा धक्का लागण्याची व त्यातच त्यांचा मृत्यू हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या शेतात ट्रान्सफार्मर असून, त्याची पेटी अनेक दिवसापासून उघडी आहे. ती व्यवस्थित करण्यासाठी आपण लाईनमनला अनेकदा विनंती केली. मात्र, त्याने याकडे अद्यापही लक्ष दिले नाही, असा आराेप धनराज शेंडे या शेतकऱ्याने केला आहे. या ट्रान्सफार्मरमधून २४ तास वीजप्रवाह सुरू असताे. अधूनमधून बिघाड निर्माण झाल्यास पेट्यांमध्येही वीजप्रवाह प्रवाहित हाेताे. या पेट्यांच्या परिसरात गाय, बैल, बकऱ्या, मेंढ्या चारा खात फिरत असतात. त्यांनाही धाेका उद्भवण्याची व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेण्याची शक्यता बळावली आहे.
...
विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू
कसाही दिवसापूर्वी खेंडा शिवारातील ट्रान्सफार्मरजवळ एक बैल चारा खात हाेता. त्या बैलाचा ट्रान्सफार्मरच्या पेटीला स्पर्श झाला आणि त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. त्यात त्या बैलाचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या घटनांमध्ये अन्य गुरांचा मृत्यू हाेऊ नये म्हणून ही समस्या साेडविण्याची मागणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. परंतु, अधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घेतली नाही, असा आराेप माजरीचे सरपंच चंद्रपाल मारबते यांच्यासह शेतकऱ्यांनी केला आहे.