शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

यू ट्युबवरून घेतले घरफोडीचे धडे :  नागपुरात उच्चशिक्षित बंटी-बबली गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 00:28 IST

हायटेक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी केल्यामुळे एका उच्चशिक्षित प्रेमी युगुलाला गजाआड व्हावे लागले. या दोघांनी घरफोडी करण्यासाठी चक्क यू ट्युबवरून धडे घेतल्याचे पोलीस चौकशीत सांगितले आहे.

ठळक मुद्देआयडिया चिटचॅड, आलिशान कारचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हायटेक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी केल्यामुळे एका उच्चशिक्षित प्रेमी युगुलाला गजाआड व्हावे लागले. शैलेश वसंत डुंबरे (वय २९, रा. संतकृपानगर, हजारी पहाड) आणि प्रिया ऊर्फ पियू (वय २१, रा. बजाजनगर) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी घरफोडी करण्यासाठी चक्क यू ट्युबवरून धडे घेतल्याचे पोलीस चौकशीत सांगितले आहे.शहरात गेल्या काही महिन्यात पुन्हा घरफोडीची मालिका सुरू झाली होती. बहुतांश गुन्ह्यात ऑरेंज कलरच्या कारचा वापर झाल्याचे दिसत असल्याने पोलिसांनी तो धागा पकडला. मानकापूर पोलिसांना तशी एक कार गोरेवाडा येथील एका बंगल्यात दिसली. तेथे राहणारा शैलेश आणि प्रिया यांच्या हालचालीही संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी या दोघांना चार दिवसांपूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताच त्यांनी अनेक घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एका कारसह सुमारे दहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.स्वप्नपूर्तीसाठी गुन्हे !शैलेशने एमबीए केले असून प्रियाने बीएफए केले आहे. अशा प्रकारे दोघेही उच्चशिक्षित असले तरी मनासारखा पैसा रोजगारातून मिळत नाही. त्यामुळे अलिशान कार आणि बंगल्यात राहण्याचे स्वप्न पूर्ण होत नसल्याचे पाहून त्यांनी स्वप्नपूर्तीसाठी घरफोडीचा मार्ग स्वीकारला. त्यासाठी त्यांनी यू ट्युबवरून घरफोडीचे धडे घेतले. त्यासाठी लागणारे गॅस सिलिंडर, पाईप, कटर, पेचकस असे साहित्यही विकत घेतले अन् एका पाठोपाठ सहा घरफोड्या केल्या. त्यातून त्यांनी विकत घेतलेली कार, दोन लॅपटॉप, सोन्याची लगडी, अमेरिकन चलन (डॉलर्स) असा एकूण ९ लाख, ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :theftचोरीArrestअटकnagpurनागपूर