शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

चुकीचे पाऊल सुधारण्यासाठी झुंजतेय नऊ जणांची 'झुंड'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 16:48 IST

पुण्यातील अल्पवयीनांना नागपूरच्या फुटबॉल मैदानावर धडे

किशोर बागडे

नागपूर : पुण्याच्या बालसुधार गृहातील १८ वर्षांखालील हे नऊ गुन्हेगार! यातील पाच जणांवर खुनाचा, तिघांवर अट्टल चोरीचा तर एकावर पोक्सो कायद्याचा गुन्हा केल्याचा खटला सुरू आहे. नकळत्या वयात या मुलांची पावले गुन्हेगारीकडे वळली. आता तिच पावले फुटबॉल मैदानावर सुधारणेकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. या मुलांचे मैदानावरील पदलालित्य पाहताच ते खेळात मोठी झेप घेऊ शकतील, याची खात्री पटते.

क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून ‘स्लम सॉकर’ला देशात ओळख मिळवून देणारे प्रा. विजय बारसे यांनी कोराडी लगतच्या गोधनी येथील फुटबॉल सेंटरवर या मुलांना एका आठवड्यासाठी येथे आणले. त्यांना येथे आणण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी न्यायालयाला विनंती करण्यात आली. बारसे यांच्यावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ चित्रपटात अशाच बालकांची धडपड मांडण्यात आली आहे. बारसे यांचे या क्षेत्रातील काम पाहून न्यायालयाने काही अटींवर फुटबॉलच्या माध्यमातून बदलाच्या प्रयोगास संमती दिली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील संदेश बोर्डे स्पोर्टस् फाउंडेशनने पुढाकार घेत या गुन्हेगारांना नागपुरात आणले आहे. ‘लोकमत’ने या मुलांशी संवाद साधला. या मुलांचे प्रश्न खूप आहेत... घरची गरिबी, ११व्या वर्गात शिकणारे, मोलमजुरी करणारे आई-वडील, स्थलांतरित कामगारांची मुले, गावातल्या विविध शोषणाला कंटाळून, मायेला, प्रेमाला वंचित होऊन दुर्लक्षित झालेली, वस्तीतल्या भाईगिरी, डॉनगिरीला बळी पडलेली, मोहापायी, घाबरून, वाईट संगतीमुळे ही धोक्याची रेषा ओलांडलेली ही मुले आहेत.

फसव्या मोहाच्या भूलभुलैयात अडकून वास्तव पार नजरेआड करून टाकलेल्या या मुलांना आता यातून बाहेर पडण्याचे मार्ग हवे आहेत. घरचे त्यांना स्वीकारायला तयार नाहीत. सर्वांमध्ये थोड्याफार फरकानं पश्चातापाची भावना आहे. बालनिरीक्षण गृहात आल्यानंतर आपापल्या पद्धतीने घडलेल्या घटनांचा विचार करायला लागली.

बदलाचा हा प्रयोग सुरुच राहणार

स्वत: आयटी अभियंता असलेले संदेश बोर्डे यांनी बारसे यांच्या मार्गदर्शनात फुटबॉलचे धडे देणे सुरू केले, दररोज सामने, सराव आणि सुधारविषयक विचारांची मेजवानी या मुलांना मिळत असल्याने सर्वांनी यापुढे हाच खेळ खेळत राहणार, असा निर्धार बोलून दाखविला. यातील काहींनी तर आपल्याला भविष्यात येथेच निवारा द्या, अशी बारसे यांना विनंती देखील केली. सर्वजण आता रविवारी रात्री पुण्याच्या येरवाडा सुधारगृहात परतणार, पण बदलाचा हा प्रयोग सुरूच राहणार आहे.

बालकांकडून नकळत गुन्हा घडला तरी सरसकट 'गुन्हेगार' असा शिक्का मारला जातो. परतीच्या वाटा बंद केल्या जातात. अशा मुलांचे आयुष्य सुरु होण्याअगोदरच बरबाद होते. यांचं काय करायचं? असा प्रश्न मनात आला. विधिसंघर्षग्रस्त मुलांकडे बघण्याची नवी दृष्टी बदलायला हवी, या भावनेतून यापुढे राज्यातील अनेक बालसुधारगृहातील गुन्हेगारांना फुटबॉल शिकविण्याचा आमचा मनोदय असेल.

- प्रा. विजय बारसे, संचालक स्लम सॉकर

टॅग्स :Footballफुटबॉलnagpurनागपूर