लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत बुलेट ट्रेनचे कोच बनविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या मते जपानची कावासाकी व भारताची भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (भेल) मिळून कोच बनविणार आहे. यासाठी बुलेट कोच फॅक्टरी नागपुरात आणण्यात येईल. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. यासाठी २०१८ च्या शेवटी कावासाकी व भेल यांच्यात करार होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुरू होणाऱ्या बुलेट ट्रेनचा बहुतांश मार्ग एलिव्हेटेड राहील. ठाणे व विरार दरम्यान २१ किलोमीटरचा मार्ग हा भुयारी राहील. त्याचबरोबर बुलेट ट्रेनचा ७ किलोमीटरचा प्रवास हा समुद्रातून राहील. एका बुलेट ट्रेनमध्ये १० कोच असणार आहे. यातील ५५ सीट बिझनेस क्लास व ६९५ सीट स्टॅण्डर्ड क्लाससाठी राहणार आहे. पुरुष व महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र वॉशरूम राहील. आजारी व्यक्तीसाठी ट्रेनमध्ये स्वतंत्र जागा राहील. ट्रेनमध्ये किड्स चेंजिंग रुमसाठी टॉयलेट सीट्स व सिंक लागले राहील. ट्रेनमध्ये फ्रीजर व हॉटकेसची सुविधा राहणार आहे. प्रत्येक कोचमध्ये एलसीडी स्क्रीन राहील. बुलेट ट्रेनच्या कोचची फॅक्टरी नागपुरात लावण्यासंदर्भात पुष्टी करण्यासाठी रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
नागपुरात बनतील बुलेट ट्रेनचे कोच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:39 IST
उपराजधानीत बुलेट ट्रेनचे कोच बनविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या मते जपानची कावासाकी व भारताची भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (भेल) मिळून कोच बनविणार आहे. यासाठी बुलेट कोच फॅक्टरी नागपुरात आणण्यात येईल. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. यासाठी २०१८ च्या शेवटी कावासाकी व भेल यांच्यात करार होण्याची शक्यता आहे.
नागपुरात बनतील बुलेट ट्रेनचे कोच!
ठळक मुद्देकावासाकी-भेल यांच्यात कराराची शक्यता