शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 20:48 IST

पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडणाऱ्या आरोपी पतीचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते. यातूनच पत्नीवर गोळी झाडण्यात आल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत उघडकीस आली आहे. मीनाबाई रवींद्र नागपुरे (४०) रा. दत्तात्रयनगर सक्करदरा असे मृत पत्नीचे तर रवींद्र हरिराम नागपुरे, असे आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान, बुधवारी उपचारादरम्यान आरोपी पतीचाही मृत्यू झाला. या घटनेने विवाहबाह्य अवैध संबंधामुळे सुखी कुटुंब कसे बर्बाद होते, हे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देनागपुरातील सक्करदरा गोळीबार प्रकरण : आरोपी पतीचाही मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडणाऱ्या आरोपी पतीचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते. यातूनच पत्नीवर गोळी झाडण्यात आल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत उघडकीस आली आहे. मीनाबाई रवींद्र नागपुरे (४०) रा. दत्तात्रयनगर सक्करदरा असे मृत पत्नीचे तर रवींद्र हरिराम नागपुरे, असे आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान, बुधवारी उपचारादरम्यान आरोपी पतीचाही मृत्यू झाला. या घटनेने विवाहबाह्य अवैध संबंधामुळे सुखी कुटुंब कसे बर्बाद होते, हे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.ही घटना मंगळवारी रात्री १०.४५ वाजता सर्वेश्वर मंदिरजवळ घडली. या घटनेमुळे नागपुरे दाम्पत्यांची दोन्ही मुलेही हादरली आहेत. पोलीस सूत्रानुसार, रवींद्र नागपुरे हुडकेश्वर परिसरात प्लायवूडचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी मीना व दोन मुलं आहेत. काही महिन्यांपूर्वी रवींद्रचे एका दुसºया महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तेव्हापासून रवींद्र पत्नी व मुलांकडे दुर्लक्ष करू लागले. त्यामुळे पत्नी मीना आणि रवींद्र यांच्यात वाद होऊ लागले. रवींद्र दोन महिन्यांपासून दुसºया महिलेसोबत राहायला गेला होता. त्यामुळे दुखावलेली मीना मुलगा अनिकेतसोबत माहेरी निघून गेली होती.मीना या तहसील कार्यालयात दस्तावेज बनवून देण्याचे काम करीत होती. रवींद्रकडून घरखर्च मिळत नसल्याने त्यांचे मोबाईलवरही वाद होत असत. अखेर मीना यांनी कौटुंबिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मंगळवारी कौटुंबिक न्यायालयात नागपुरे दाम्पत्यांची तारीख होती. मुलाने वडिलांना फोन केला होता. तेव्हा आता न्यायालयातूनच खावटी घेण्याबाबत रवींद्र बोलला होता. परंतु मंगळवारी रवींद्र न्यायालयात आलाच नाही.पत्नीच्या गळ्यावर झाडली गोळीआरोपी रवींद्र मंगळवारी रात्री १०.३० वाजता कारने दत्तात्रयनगर येथील पत्नीच्या घरी पोहोचला. त्याचा पत्नी मीनासोबत काही वेळ जोरदार शाब्दिक वाद झाला आणि काही वेळातच गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला. घराबाहेर पळत सुटलेल्या मीना नागपुरे यांच्या गळ्यातून रक्त वाहत होते. घराबाहेर येताच त्या जमिनीवर कोसळल्या.पळून जाण्याचा मार्ग नसल्याने स्वत:वर झाडली गोळीघरातून गोळी चालल्याचा आवाज ऐकूण मुलगा धावत आला. वडील बहेर पळून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याने मुलाने बाहेरून दरवाजा बंद केला. पळून जाण्याचा मार्ग बंद झाल्याने अखेर रवींद्रनेही संतापून स्वत:च्या छातीवर गोळी झाडली. तो सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. वडील आणि आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून मुलगा अनिकेतने पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. यानंतर ठाणेदार सांदीपन पवार, पीएसआय डोळे आणि पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाले.अगोदर पत्नी व नंतर पतीनेही सोडला जीवदोघांना गंभीर अवस्थेत पाहून पोलिसांनी जखमी दाम्पत्यास मेडिकल रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान रात्री १२.१५ वाजता मीनाचा मृत्यू झाला. तर रवींद्रला रात्री उशिरा २ वाजता मृत घोषित करण्यात आले. सक्करदरा पोलिसांनी अगोदर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. नंतर आरोपी रवींद्रच्या मृत्यूनंतर कलम ३०९ अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :FiringगोळीबारMurderखून