शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजावर चालला बुलडोझर, दोन हजार चक्री नष्ट; नागपूर पोलिसांची कारवाई

By योगेश पांडे | Updated: January 13, 2025 22:04 IST

नागपूर पोलिसांची कारवाई : संक्रांतीच्या दिवशी पोलिसांचा राहणार पतंगबाजांवर वॉच

योगेश पांडेनागपूर : मकरसंक्रांतीच्या पुर्वसंध्येला नागपुरात पोलिसांनी तब्बल १८ लाख रुपये किंमतीचा नॉयलान मांजा रोडरोलरखाली नष्ट केला. ही कारवाई इंदोरा मैदानात नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या पुढाकारातून ही कारवाई करण्यात आली. यात आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विविध गुन्ह्यांत नॉयलान मांजा जप्त करण्यात आलेल्या दोन हजारांहून अधिक चक्रींचा समावेश होता.मनपा प्रशासनाच्या सुस्त भूमिकेमुळे शहरात काही महिन्यांअगोदरच नायलॉन मांजाचा साठा पोहोचला.

 दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी होतात व काहींचा जीवदेखील गेला आहे. यावर्षी पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यापासूनच कारवाईला सुरुवात केली होती. संपूर्ण नागपुरात पोलिसांनी यंदा १८३ आरोपींना पकडून १३१ गुन्हे दाखल केले असून ७५ लाखांहून अधिकचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. कोराडी, जरीपटका, कपीलनगर, यशोधरानगर, पारडी, कळमना आणि नवी कामठी, जुनी कामठी या आठ पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस निरीक्षक आणि अंमलदारांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विरोधात सतत कारवाई केली. उपायुक्त कदम स्वत: मोबाईल सर्व्हिलेन्स वाहनाव्दारे पतंग उडविणारे आणि विक्रेत्यांवर लक्ष ठेवून होते. आठही पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्लॅस्टिक पतंग आणि नॉयलान मांजा जप्त करण्यात आला. इंदोरा मैदान येथे दोन हजार चक्रीसह १८ लाखांचा मांजा ठेवण्यात आला. उपायुक्त निकेतन कदम यांच्या उपस्थितीत त्यावर रोडरोलर फिरवून संपूर्ण चक्री नष्ट करण्यात आल्या. नष्ट करण्यात आलेला मुद्देमाल डंपिंग यार्ड येथे पाठविण्यात आला. यावेळी आठही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार उपस्थित होते. याप्रसंगी मांजा नष्ट करण्याची प्रक्रिया बघण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

नायलॉन मांजाचा वापर केला तर गुन्हा

कुणीही प्रतिबंधित नॉयलान मांजाचा पतंग उडविण्यासाठी वापर करु नये. विक्रेत्यांवर कठोर कारवाई पोलीस करीत आहेत. ड्रोनद्वारे आम्ही मैदानावरुन पतंग उडविणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहोत. कुणाकडे नॉयलान मांजा दिसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस विभागाकडून देण्यात आला आहे.