शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरची ४० कोटींची प्रॉपर्टी जप्त

By admin | Updated: June 20, 2017 01:39 IST

घरकुलाचे स्वप्न दाखवून शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करणाऱ्या, नागरिकांची फसवणूक करून ...

हेमंत झाम यांना दणका   शेकडो नागरिकांची फसवणूक   घरकुलाचे स्वप्न प्रॉपर्टी सेलची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरकुलाचे स्वप्न दाखवून शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करणाऱ्या, नागरिकांची फसवणूक करून त्यांना आर्थिक नुकसानासोबत मानसिक त्रास देणाऱ्या झाम बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सचा संचालक हेमंत सिकंदर झाम यांच्या ताब्यातील ४० कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने केलेल्या या दणकेबाज कारवाईमुळे फसवणूक करणाऱ्या बिल्डर लॉबीत खळबळ निर्माण झाली आहे.मौजा वागदरा (ता. हिंगणा) येथील खसरा नं. ९४,९७, १०८, १०९ मधील ३० एकरात झाम बिल्डर्स अ‍ॅड डेव्हलपर्सचा संचालक हेमंत सिकंदर झाम यांनी कन्हैया सिटी नावाचा गृहप्रकल्प सुरू करण्याची २०१० मध्ये घोषणा केली होती. येथे सदनिका, बंगलो, रो हाऊसेसचे बुकिंग करणारांना १८ ते ३६ महिन्यात ताबा देण्याचे लेखी आश्वासन झाम बिल्डरकडून दिले जात होते. त्यामुळे सुमारे ४१८ ग्राहकांनी त्याच्याकडे सदनिका, बंगलो, रो हाऊसेसची नोंदणी केली. बिल्डरने सांगितल्याप्रमाणे संबंधितांनी त्याला लाखोंची रक्कमही दिली. मात्र, बिल्डरने ठरल्याप्रमाणे ग्राहकांना १८ महिनेच काय, सात वर्षे होऊनही त्यांच्या स्वप्नातील घराचा ताबा दिला नाही. श्रीकांत रामचंद्र जनबंधू (वय ४३, रा. समतानगर) यांनीही २ मे २०११ रोजी सदनिका बुक करून झामकडे २ लाख ३९ हजार ८०० रुपये जमा केले. ९ नोव्हेंबर २०११ रोजी बिल्डरने तसे मालकी हक्काबाबतचे अ‍ॅग्रीमेंट टू सेल करून देत १८ महिन्यात सदनिकेचा ताबा देणार असे सांगितले. त्यानंतर जनबंधू जेव्हा जेव्हा आपल्या स्वप्नातील सदनिका बघायला गेले तेथे त्यांना केवळ कुंपण भिंतच दिसून येत होती. त्यामुळे जनबंधू आणि त्यांच्यासारख्याच अनेकांनी झामच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. बिल्डरने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे जनबंधू यांनी १९ आॅक्टोबर २०१५ रोजी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी या फसवणुकीच्या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले. हे प्रकरण गुन्हेशाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे तपासाला आले. पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर याच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी वजीर शेख यांनी १० जून २०१७ पासून तपास सुरू केला. आठवडाभरात ९८ जणांचे बयानआठवडाभराच्या तपासात हेमंत झाम आणि झाम बिल्डरच्या संचालकांनी केवळ जनबंधूच नव्हे तर शेकडो जणांकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. रक्कम जमा करणाऱ्या ९८ जणांनी तसे आपल्या बयानात पोलिसांना सांगितले. सोमलवाड्यातील पर्यावरणनगरात झाम बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स प्रा.लि. चे मुख्य कार्यालयातही पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तेथेही फसगत झालेले अनेक जण येरझारा मारत असल्याचे उघड झाले. ९८ जणांच्या जबानीतून फसवणुकीचा आकडा २ कोटी, ९८ लाख, ८७ हजार, २२८ रुपये असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून रविवारी झाम बिल्डरच्या ताब्यातील ४० कोटींची मालमत्ता जप्त केली. २५ ग्राहकांना २६ लाख परत गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडून चौकशी सुरू झाल्यामुळे हेमंत झाम याने कारवाई टाळण्यासाठी ४ दिवसात २५ ग्राहकांशी भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना २६ लाख रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे परत केले. उर्वरित रक्कमही लगेच परत करतो, असे झामकडून सांगितले जात होते. या पद्धतीने आपल्यावरील कारवाई टाळण्याचा झाम बिल्डरचा डाव होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या मनसुब्यावर पाणी फेरून त्याची मौजा वाघदरा येथील गृहप्रकल्पाची समारे ४० कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली. तसा अहवालही कोर्टाला सादर केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे झाम बिल्डर आणि त्याच्यासारखेच ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अनेक बिल्डरचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात पोलीस लवकरच अटकेचीही कारवाई करू शकतात, असे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले आहे. लकी ड्रॉ अन् बरेच काही झाम बिल्डरच्या संचालकांनी नागरिकांना गृहप्रकल्पात रक्कम गुंतविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षित केले. लकी ड्रॉ च्या माध्यमातून मोफत सदनिका देण्याचेही स्वप्न दाखविले. कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी किंमतीत आम्हीच घरकूल देतो, असाही दावा केला. मात्र, कोणत्याच दाव्याची पूर्तता केली नाही. उलट ज्यांनी झाम बिल्डरच्या संचालकांच्या दाव्यावर विश्वास ठेवला, त्यांना आर्थिक नुकसानासोबतच प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणात सोनेगाव पोलिसांची भूमिकाही बरीच संशयास्पद आहे. ठाण्यातील काही मंडळी झाम बिल्डरच्या संचालकांशी मधूर संबंध ठेवून त्याच्या आलिशान कारमध्ये फिरण्याचा आनंद उपभोगत असल्याचे जुने चित्र होते. या प्रकाराचाही तपास झाल्यास धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. दरम्यान, या दणकेबाज कारवाईनंतर गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वजीर शेख पुढील तपास करीत आहेत.