शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

बिल्डर सागर रतनला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २५ कोटी रुपये किमतीची जमीन केवळ ३.५७ कोटी रुपयात बळकावणाºया चर्चित बिल्डर सागर रतन आणि त्याच्या एका साथीदाराला गुन्हे शाखेच्या एसआयटीने अटक केली आहे. एसआयटीच्या या कारवाईमुळे बिल्डर लॉबी हादरली आहे. विकास जैन (५०) रा. संघ बिल्डिंग महाल, असे सागर रतनच्या साथीदाराचे नाव आहे.बेसा येथे मिलिंद ...

ठळक मुद्दे३.५७ कोटीत बळकावली २५ कोटीची जमीनविकास जैनही अडकला : एसआयटीच्या तपासात खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २५ कोटी रुपये किमतीची जमीन केवळ ३.५७ कोटी रुपयात बळकावणाºया चर्चित बिल्डर सागर रतन आणि त्याच्या एका साथीदाराला गुन्हे शाखेच्या एसआयटीने अटक केली आहे. एसआयटीच्या या कारवाईमुळे बिल्डर लॉबी हादरली आहे. विकास जैन (५०) रा. संघ बिल्डिंग महाल, असे सागर रतनच्या साथीदाराचे नाव आहे.बेसा येथे मिलिंद सोसायटी आहे. या सोसायटीची स्थापना १९८७-८८ मध्ये झाली. त्यावेळी सोसायटीचे सचिव शालिकराम ढोरे होते. ढोरेने सोसायटीच्या मालकीची ४ एकर जागा ७० प्लॉट धारकांना विकली. पोलीस सूत्रानुसार २००३ मध्ये ढोरेने सचिवपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या उपस्थितीत संदीप विश्वलोचन जैनला अध्यक्ष आणि त्यांचे साळे विकास रामचंद्र जैन (५०) याला सचिव नियुक्त केले. त्यांच्या परिवारातील इतर सात सदस्यांनाही मिलिंद सोसायटीचे पदाधिकारी बनवण्यात आले. याप्रकारे संदीप जैन आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित झाले. संदीप सोसायटीचा अध्यक्ष बनला.संदीप जैनने जुलै २००५ मध्ये सोसायटीच्या सात-बारावर आपले नाव नोंदविले. जमीन प्लॉट धारकांच्या ताब्यात आल्याने संदीप त्याला विकू शकत नव्हता. २००८ मध्ये ही जमीन मिलिंद पुराणिक यांना विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. याची माहिती होताच काही प्लॉटधारकांनी न्यायालयाचा आश्रय घेतला. पुराणिकच्या वकिलांनी न्यायालयात त्यांच्याकडून जमीन विकत घेतल्याची बाब स्पष्टपणे नाकारली. मिलिंद सोसायटीतील सभासदांनी सुद्धा जमिनीची विक्री करण्यात आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर हे प्रकरण रद्द करण्यात आले.१४ आॅगस्ट २००३ रोजी जैन परिवाराने वार्षिक आमसभेत जमीन विकण्याचा प्रस्ताव पारित केला. यानंतर १७ जून २०१६ रोजी जैनने साथीदारांच्या मदतीने जमिनीवर कब्जा केला. प्लॉटधारकांना धमकावून हाकलले. काही प्लॉटधारकांनी केलेले बांधकामही पाडण्यात आले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी संदीप जैन आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल केला होता. जैन परिवाराने अवैधपणे कब्जा केल्याने काही सदस्यांनी न्यायालयातही याचिका दाखल केल्या होत्या. जैन परिवाराच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी येत असल्याने ३१ मार्च २०१७ रोजी सहकार विभागाने सोसायटीवर प्रशासक नियुक्त केला. प्रशासक नियुक्तीची माहिती होताच जैन परिवाराने ३१ मार्च रोजी जमीन मे. लक्ष्मी रतन बिल्डरचे संचालक सागर सत्यनारायण रतनला ३.५७ कोटी रुपयात विकली.तसेच जमिनीचा कब्जाही दिला. रजिस्ट्री केल्यानंतर चार दिवसानंतर ५ एप्रिल रोजी सागर रतनने जमिनीवर आपल्या नावाचा बोर्ड उभारून बांधकाम सुरू केले. यानंतर प्लॉटधारक आणि सोसायटीच्या माजी पदाधिकाºयांनी याची एसआयटीकडे तक्रार केली.पोलीस निरीक्षक ललित वर्टीकर यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना तपासात आढळून आले की, रेडीरेकनरनुसार जमीन ३ कोटी ५६ लाख ४ हजार रुपये किमतीची आहे. परंतु बाजारभावानुसार या जमिनीची किंमत तब्बल २५ कोटी इतकी आहे. रजिस्ट्री खर्च, मुद्रांक शुल्क, दस्तावेज तयार करण्याचा खर्च आणि टीडीएससुद्धा रतनऐवजी जैन परिवारानेच भरला. साधारणपणे हा खर्च जमिनीची खरेदी करणाºयाला भरावा लागतो.सागर रतन याला जमिनीची मालकी आणि जैन परिवाराला सोसायटीचे पदाधिकारी बनविण्यात आल्याबाबत न्यायालयात वाद सुरू आहे, याची माहिती होती. यानंतरही त्याने जमिनीची खरेदी करताना त्याने कायदेशीर बाबींची प्रक्रिया पूर्ण केली नाही. या आधारावर एसआयटीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सागर रतन आणि विकास जैन याला अटक केली. जैन परिवाराने ज्या प्रस्तावाच्या आधारावर जमिनीची विक्री केली आहे, तो प्रस्तावच अवैध असल्याचीही माहिती पुढे आली आहे. या प्रस्तावात स्वाक्षरी असणाºया काही सदस्यांनी त्यांच्या बोगस स्वाक्षºया असल्याचे सांगितले आहे.पोलीस काय करीत होतेसूत्रानुसार या प्रकरणातील पीडितांनी अगोदर हुडकेश्वर आणि गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. परंतु कुणीही याला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पोलिसांनीसुद्धा आरोपींना संरक्षण देण्याचेच काम केले. हे प्रकरण एसआयटीकडे आल्यावरच त्याला गती मिळाली.परिवाराच्या मदतीने फसवणूकपोलीस सूत्रानुसार, जैन परिवाराची सेंट्रल एव्हेन्यूवर हिरा फायनान्स नावाची कंपनी आहे. या प्रकरणात संदीप जैनचा साळा विकास जैन याच्याशिवाय परिवारातील इतर सदस्यही सहभागी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सोसायटीची संपत्ती बळकावण्यासाठीच जैन परिवाराने त्यावर कब्जा केल्याचा पोलिसांना संशय आहे. आपल्याच कुटुंबातील सदस्यांना पदाधिकारी बनवून जैनने सोसायटी कायद्याचेही उल्लंघन केले आहे. सागर रतन स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत आहे.