शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019; आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्या बेरोजगार करतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 10:39 IST

जीएसटीचा मुद्दा असो वा सिबलचा तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असो की हमीभावाचा किंवा प्राप्तिकरातील तरतूदींचा, अवघा देश थोड्याच वेळात जाहीर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी यंत्र पेढी सरकारने सुरू करावीअंतरिम अर्थसंकल्पावर व्यावसायिक व शेतकऱ्यांची भिस्ततरुण व्यापाऱ्यांना दिलासा मिळावासिबिल रद्द व्हावे

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जीएसटीचा मुद्दा असो वा सिबलचा तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असो की हमीभावाचा किंवा प्राप्तिकरातील तरतूदींचा, अवघा देश थोड्याच वेळात जाहीर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाची आर्थिक घडी नीट बसावी अशीच आशा देशवासियांच्या मनात आहे. याबाबत नागपुरातील व्यापारी वर्ग व कृषक क्षेत्रातील जाणकार काय म्हणत आहेत हे पाहू या.नॅशनल कॉन्फिडिरेशन ऑफ ऑल स्मॉल ट्रेडर्स नवी दिल्ली या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया यांच्या मते, व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांपेक्षाही वाईट अवस्था आहे. आज व्यापार करण्यासाठी भांडवलाची अधिक गरज आहे. व्यापाऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी कुठलीच ठोस योजना नाही. यांनी मुद्रा लोन योजना आणली पण त्याचा काहीच फायदा नाही. आमची सरकारकडे कर्ज माफीची अपेक्षा नाही. पण सिबिल रद्द करावे म्हणजे आम्हाला कर्जे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. या संदर्भात आम्ही पंतप्रधानांना पत्रही पाठविले आहे. तसेच एक सेटलमेंट स्कीम आणावी. त्यात सर्व गोष्टी स्वच्छ व्हाव्यात, मग आम्ही नवी सुरूवात करू शकू व आर्थिक स्थिरता येऊ शकेल.नागपुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक ज्ञानेश्वर रक्षक यांच्या मते, हे सरकार व्यापाऱ्यांचे हित पाहणारे सरकार अशी त्याची प्रतिमा आहे. जेव्हा हे सरकार स्थापन झाले तेव्हा ते छोट्या व्यावसायिकांना सक्षम बनवील असे वाटले होते. पण जीएसटी असो वा व्हॅट यामुळे आम्ही लहान व्यावसायिक त्रस्त आहोत. तसेच बेरोजगाराचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. या बेरोजगार तरुणांना सरकारने आर्थिक बळ द्यावे. त्यांना भांडवल पुरवून व्यवसायात येण्यास प्रवृत्त करावे. मात्र सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. आपल्या देशात विदेशी कंपन्यांची घुसखोरी सुरू झाली आहे. ऑनलाईनचा व्यापार वाढतो आहे. आज शेतकरी आत्महत्या करताना आपण पाहतो. उद्या या देशातला बेरोजगार तरुण आत्महत्या करू लागेल.कृषी व्यवसायी व नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य सतीश बंग यांच्या मते,शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने यंत्र पेढ्या सुरू कराव्यात. शेतकऱ्यांजवळ अत्याधुनिक यंत्रणा नाही. त्या खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे आर्थिक बळ नाही. त्याला जर अशा यंत्रणा पुरवल्या तर तो अत्याधुनिक पद्धतीने शेती करू शकेल व उत्पादनात वाढ होऊन देशाचे हित त्यात साधता येईल.युवा व्यवसायी मधुर बंग यांच्या मते, हे बजेट व्यापारी वर्ग व शेतकऱ्यांच्या हिताचे असण्याची शक्यता आहे. हे निवडणूक वर्ष असल्याने यात मोठ्या घोषणा होण्याचीही शक्यता आहे. तसेच यात जीएसटीतील अनियमिततेवर अधिक लक्ष दिले जाईल असेही वाटते. आपल्या देशात कास्तकार व लहान व्यापाऱ्यांना या अर्थसंकल्पातून भरघोस मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019