शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जपान व भारतातील बौद्धांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:30 IST

जपान आणि भारतातील बौद्धांनी एकमेकांशी संपर्क वाढवावा, एकत्र यावे, एकजूट व्हावे, असे भावनिक आवाहन जपानमधील टोकिया विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. तस्सोसी नेमोतो यांनी शुक्रवारी दीक्षाभूमीवरून केले.

ठळक मुद्देजपान आणि भारतातील बौद्धांनी एकमेकांशी संपर्क वाढवावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जपान आणि भारतातील बौद्धांनी एकमेकांशी संपर्क वाढवावा, एकत्र यावे, एकजूट व्हावे, असे भावनिक आवाहन जपानमधील टोकिया विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. तस्सोसी नेमोतो यांनी शुक्रवारी दीक्षाभूमीवरून केले.६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने शुक्रवारी दीक्षाभूमीवर जागतिक धम्मपरिषद आयोजित करण्यात आली होती. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई अध्यक्षस्थानी होते. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी या परिषदेचे उद्घाटन केले.भिक्खू अश्वघोष, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, प्राचार्य पी.सी. पवार, प्रा. मेमोरो आदी व्यासपीठावर होते.डॉ. नेमोतो म्हणाले, शिक्षण हे एक असे माध्यम आहे ज्यामुळे आपले जीवन जीवनात यशस्वी होतो. एक उंची गाठू शकतो. बदल घडवून आणू शकतो. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा शिकण्याचा मंत्र दिला आहे. तेव्हा खूप शिका, आपल्या मुलाबाळांना शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.भिक्खू अश्वघोष यांनी देशभरातील बौद्धांच्या एकजुटीवर भर दिला. एस.के. गजभिये यांनी संचालन केले. यावेळी स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, अ‍ॅड. आनंद फुलझेले, प्रा. देवीदास घोडेस्वार, गौतम अंबादे आदी उपस्थित होते.जपानच्या विद्यार्थ्यांना बाबासाहेब सांगणारे प्राध्यापकडॉ. तस्सोसी नेमोतो हे जपानमधील टोकियो विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. ते समाजविज्ञान शिकवतात. परंतु मागील काही वर्षांपासून ते जपानमधील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरही समजवून सांगत आहेत. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जपानच्या लोकांपर्यंत पोहोचले. त्यांच्याबद्दल असलेल्या आकर्षणातून डॉ. नेमोतो हे भारतात त्यातही नागपुरात आले. त्यांनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला. तेव्हापासून ते सातत्याने दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी स्वत: आत्मसात केले असून आता ते जपानच्या विद्यार्थ्यांनाही बाबासाहेब समजवून सांगतात.