शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

फुटाळा परिसरात साकारणार बुद्धिस्ट थीम पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 21:34 IST

शहरातील नागरिकांचे आकर्षण असलेल्या फुटाळा तलाव परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्प साकारला जाणार आहे. यावर एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गुरुवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागरिकांचे आकर्षण असलेल्या फुटाळा तलाव परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्प साकारला जाणार आहे. यावर एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गुरुवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.फुटाळा तलावातील बुद्धिस्ट थीमपार्क येथे ११५ फू ट उंचीची बुद्धमूर्ती, वाचनालय, अभ्यास गृह आदींचा समावेश असलेला भव्य सेंट्रल प्लाझा, साडेतीन हजार व्यक्तीसाठी खुले सभागृह, तसेच मनोरंजनाच्या सोयी प्रस्तावित आहेत. त्रिशताब्दी महोत्सवांतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे ११५ फूट उंचीची बुद्ध मूर्ती २ हजार २९० चौरस मीटर जागेवर उभारली जाणार आहे. तलाव काठावर भ्रमंतीसाठी प्रोमनेड, तलाव काठावर बसण्यासाठी पायऱ्या, नौका विहारासाठी जेटी उभारण्यात येईल. त्याखेरीज येथे आर्ट अ‍ॅन्ड क्राफ्ट व्हिलेज, ४२ हजार ४००चौ.मी. क्षेत्रात भव्य सेंट्रल प्लाझा सभागृह, वाचनालय, अभ्यासगृह, प्रदर्शन हॉल, उद्याने, खेळण्यासाठी जागा, शिल्प उद्यान, साडेतीन हजार आसन क्षमतेचे खुले सभागृह, बहुद्देशीय भव्य ध्यानधारणा सभागृह, बुद्धविहार, गौतम बुद्धांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित भित्तीशिल्पे, भिंत्तीचित्रे यामुळे हे थीमपार्क प्रेक्षणीय होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या शिल्पाकडे जागतिक बौद्ध धर्मीय राष्ट्र आकर्षित होतील, पर्यटक येतील. यामुळे नागपूर पर्यटनाचे जागतिक केंद्र होईल. असा विश्वास नितीन राऊत यांनी व्यक्त केला.अभ्यासक व पर्यटकांसाठी येथे हॉटेल उभारले जाईल. व्याख्यानासाठी सभागृह, राहण्यासाठी ३५ खोल्या असतील. या जमिनीची मालकी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे असून ती संपादित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. हा प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून राबविला जाणार आहे.

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलाव