शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

योग्य वेळी घेणार बौद्ध धम्माची दीक्षा : मायावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 20:47 IST

मी नक्कीच बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. परंतु त्यासाठी योग्य वेळ यायची आहे. योग्य वेळ आली, माझ्यासोबत मोठ्या संख्येने लोक धम्म स्वीकारण्यास तयार झाले की मीसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेईल, असे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे जाहीर केले.

ठळक मुद्देभाजप-काँग्रेसच्या धोरणावर केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली; परंतु प्रत्यक्षात बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला अनेक वर्षे घेतली. यामागे त्यांचे एक नियोजन होते. आपल्या अनुयायांना यासाठी त्यांना तयार करावयाचे होते. माझ्या बाबतीतही कार्यकर्ते असाच विचार करीत असतील की मायावती या बौद्ध धम्माची दीक्षा कधी घेणार? मी नक्कीच बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. परंतु त्यासाठी योग्य वेळ यायची आहे. योग्य वेळ आली, माझ्यासोबत मोठ्या संख्येने लोक धम्म स्वीकारण्यास तयार झाले की मीसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेईल, असे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे जाहीर केले. 

बसपाच्या विदर्भातील सर्व ६२ उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी इंदोरा येथील मैदानात बसपा अध्यक्ष मायावती यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी पक्षाचे प्रदेश प्रभारी खा. वीरसिंग, डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे आदी उपस्थित होते.मायावती म्हणाल्या, काँग्रेस आणि भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. काँग्रेस आणि भाजपचे आतून संगनमत आहे. या संगनमतामुळेच शासकीय नोकरीतील आरक्षणाला निष्प्रभ करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. कांशीराम यांनी महाराष्ट्रातून राजकीय चळवळीची सुरुवात केली, परंतु त्यांना येथे कधीच यश आले नाही, याची खंत त्यांनी नेहमीच होती. ती खंत मलाही आहे. येथील आंबेडकरी अनुयायी घोषणा खूप देतात, परंतु मत देताना ते गोंधळून जातात. आंबेडकरी अनुयायी अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या राजकीय विचारांवर चालत नाहीत, अशी खंतही मायावती यांनी व्यक्त केली.भारत हे हिंदू नव्हे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्रभारत हे हिंदू राष्ट्र नव्हे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे स्पष्ट करीत आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याचा जाहीर निषेध बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी केला. भागवत यांनी हा देश हिंदूंचा असल्यामुळेच येथे मुस्लीम आनंदात असल्याचे वक्तव्य केले होते. याची आठवण करून देत भागवत यांनी सच्चर कमिटीचा अहवालाचा अभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी