शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील चिटणीस पार्कमध्ये फुग्याचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:52 IST

बालक दिनानिमित्त महापालिकेतर्फे महाल येथील चिटणीस पार्क येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात गॅसच्या फुग्याचा स्फ ोट झाल्याने महापालिकेच्या शाळांतील अनेक विद्यार्थी जखमी झाले.

ठळक मुद्देअनेक विद्यार्थी जखमीबालक दिनाच्या कार्यक्रमात विघ्नमहापालिकेचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतनागपूर : बालक दिनानिमित्त महापालिकेतर्फे महाल येथील चिटणीस पार्क येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात गॅसच्या फुग्याचा    स्फोट झाल्याने महापालिकेच्या शाळांतील अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर घटनेत नेमके किती विद्यार्थी जखमी झाले त्या विद्यार्थ्यांची नावे व त्यांची संख्या महापालिक प्रशासनाकडून प्राप्त झाली नव्हती.या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन, पदाधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी कोणत्याही स्वरूपाची माहिती देत नव्हते. घटनेनंतर लोकमत प्रतिनिधीने शाळांचे शिक्षक, महापालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच कार्यक्रमाचे आयोजक यांच्याशी संपर्क केला. परंतु अशी कुठलीही घटना आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.घटना घडली तेव्हा उपस्थित नसल्याचे दिलीप दिवे यांनी सांगितले. वास्तविक त्यांना या घटनेची माहितीच नव्हती. कार्यक्रमाच्या वेळी काही तरी घडल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षणाधिकारयांनी त्यांना दिली होती. नेमके काय घडले, याची माहिती त्यांच्याकडे नव्हती.त्यामुळे महापालिके च्या शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.विद्यार्थी एकमेकांवर पडलेमहापालिकेतर्फे चिटणीस पार्क येथे सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रम संपत असताना काही विद्यार्थी मंचावर लावण्यात आलेले गॅसचे फुगे घेण्यासाठी धावले. यात फुगा फुटला. यामुळे मंचावर चढताना एकच गोंधळ उडाला. यात विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर पडले. फुगा फुटल्याने काही विद्यार्थ्यांच्या डोळ्याला व हाताला इजा झाली.