शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बसपा बांधणार पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मोट; मायावती उद्या नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 20:34 IST

देशभरात कार्यकर्त्यांचे जाहीर मेळावे आयोजित करून मायावती संवाद साधत आहे. १० डिसेंबर रोजी त्या नागपुरात कस्तुरचंद पार्कवर कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणार आहेत.

ठळक मुद्देकस्तुरचंद पार्कवर जाहीर मेळावा

आॅनलाईन लोकमतनागपूर : बसपा हा मुळातच कॅडरबेस कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. परंतु गेल्या काही वर्षात या कॅडरकडेच बसपाचे दुर्लक्ष होत गेले. त्याचा फटका बसपाला उत्तर प्रदेशासह एकूणच देशात बसला आहे. अशा कॅडरबेस कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने देशभरात बसपाचा जनाधार ढासळत चालला आहे. हा जनाधार पुन्हा कायम ठेवण्यासाठी मायावती यांनी कॅडरबेस कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बांधणीवर पुन्हा एकदा भर दिला आहे. या अंतर्गत देशभरात कार्यकर्त्यांचे जाहीर मेळावे आयोजित करून मायावती संवाद साधत आहे. १० डिसेंबर रोजी त्या नागपुरात कस्तुरचंद पार्कवर कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणार आहेत.बसपाने कॅडरबेस कार्यकर्त्यांच्या भरवशावरच उत्तर प्रदेशात चारवेळा सत्ता स्थापन केली. सत्तेत नसतानाही बसपा उत्तर प्रदेशातील एक प्रमुख पक्ष राहिला आहे. परंतु गेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. अशीच परिस्थिती देशातील इतर राज्यांमध्येसुद्धा झाली. महाराष्ट्राचा विचार करता बसपाचा मुख्य जनाधार हा विदर्भ राहिलेला आहे. यातही आंबेडकरी समाज हा बसपाचा मुख्य मतदार राहिला आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून बसपाच्या कॅडरबेस कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने बसपाचा हा जनाधार काहीसा कमी झाला आहे. यातच महाराष्ट्रात सुरेश मानेसारख्या ज्येष्ठ नेत्याला बसपातून बाहेर काढण्यात आले. त्यांनी स्वतंत्र बीआरएसपी पक्ष स्थापन केला. तेव्हा बसपाचे अनेक नेते व कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेले. इतकेच नव्हे तर बसपा राबवित असलेले कार्यक्रम बीआरएसपी मोठ्या प्रमाणात राबवित असून एक वेगळेच आव्हान निर्माण केले आहे. नागपूरचा विचार केला असता गेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बसपाचे १२ नगरसेवक निवडून आले होते. त्यांची संख्या आता १० वर आली आहे. या सर्वांचाच एकूण विचार करता महाराष्ट्रातील मुख्य जनाधारही कमी होऊ लागल्याने बसपा चिंतेत आहे.त्यामुळे बसपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आत्ताच सुरू केली आहे. मायावती या देशभरात जाहीर सभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहे. तीन राज्य मिळून एक सभा असा त्यांचा कार्यक्रम आहे. येत्या १० डिसेंबर रोजी नागपुरातही जाहीर सभा होत आहे. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या २०० व्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ हा कार्यकर्ता मेळावा बसपाने आयोजित केला आहे. येथून मायावती पुन्हा आपला जनाधार आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या या सभेबाबत कार्यकर्त्यांमध्येही बरीच उत्सुकता आहे.भीम आर्मी व जिग्नेश मेवानीचाही परिणामउत्तर प्रदेशात चंद्रशेखर रावणच्या भीम आर्मी आणि गुजरातमध्ये जिग्नेश मेवानी यांनी दलितांवरील अत्याचारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारले. या आंदोलनाला दलित समाजात विशेषत: तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दलित समाजात हे नवीन नेतृत्व निर्माण झाल्यामुळे दलित समाज बसपापासून दुरावणार तर नाही ना? अशी भीतीही मायावती यांना वाटू लगली आहे. त्यामुळेसुद्धा त्या पुन्हा एकदा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Politicsराजकारण