शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बसपा यंदा खातेही उघडणार आणि राज्यात मान्यताही मिळवणार

By आनंद डेकाटे | Updated: March 16, 2024 16:04 IST

बसपा नेत्यांचा विश्वास : कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज दिन साजरा

नागपूर : बसपा हा राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष असला तरी राज्यात त्याला मान्यतेसाठी अजून पर्यंत हवी तेवढी मते व निकाल मिळालेला नाही. परंतु या लोकसभा निवडणुकीत बसपाला मान्यता प्राप्त होण्याऐवढी मते सुद्धा मिळतील आणि राज्यात बसपाचे खातेही उघडेल, असा विश्वास बसपा नेत्यांनी व्यक्त केला. बहुजन नायक व बसपाचे संस्थापक कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बहुजन समाज दिवस कार्यक्रमादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.हिंदी मोर भवन सीताबर्डी येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसपाचे प्रदेश महासचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज अॅड सुनील डोंगरे हे होते. पृथ्वीराज शेंडे, दादाराव उईके, उत्तम शेवडे, राहुल सोनटक्के, विलास सोमकुवर, मुकेश सरकार, साहित्यिक शूद्र शिवशंकर यादव प्रामुख्याने उपस्थित होते.

कांशीरामजींचा जन्मदिवस, देशभर बहुजन समाज दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहुजन चळवळीत कार्य करणाऱ्या सक्रिय ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना कांशीरामजी रत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावेळी नागपुरातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कांशीरामजींच्या अस्थिकलशा समोर बसपा कार्यकर्त्यांनी बसपाला यश मिळेपर्यंत सक्रियरित्या कार्य करण्याची शपथ घेतली. संचालन जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी केले. तर जिल्हा सचिव अभिलेश वाहाने यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूर