शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

अल्पवयीन बहिणीच्या मित्राचा केला निर्घृण खून; बळजबरीने शारीरिक संबंध जोडल्याचा राग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 22:31 IST

Nagpur News ब्लॅकमेल करीत अल्पवयीन मुलीसाेबत बळजबरीने अनैतिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे चिडलेल्या भावाने मित्राच्या मदतीने त्या तरुणाच्या पाेटावर चाकूने वार करीत त्याची हत्या केली

नागपूर : ब्लॅकमेल करीत अल्पवयीन मुलीसाेबत बळजबरीने अनैतिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर मुलीच्या आईला या संबंधांबाबत साेशल मीडियावर वाच्यता करण्याची धमकी दिली. त्यामुळे चिडलेल्या मुलीच्या भावाने मित्राच्या मदतीने त्या तरुणाच्या पाेटावर चाकूने वार करीत त्याची हत्या केली व मृतदेह चादरीत गुंडाळून झुडपात फेकला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी येथे रविवारी (दि. २४) ७ वाजताच्या सुमारास घडली असून, रात्री १० नंतर उघडकीस आली. या प्रकरणात दाेघांना अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार पुंडलिक भटकर यांनी दिली.

अय्याज ऊर्फ छुट्टन इस्राइल सिद्दीकी (३०) असे मृताचे तर इरफान खान (२४) व मेहबूब ऊर्फ टिनू सिद्दीकी (२०), अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. तिघेही वलनी, ता. सावनेर येथील रहिवासी आहेत. अय्याजचे कुटुंबीय मुळचे उत्तर प्रदेशातील असून, ते नाेकरीनिमित्त वलनीत आले आहेत. अय्याज व इरफान शेजारी असल्याने त्यांची आपसात ओळख हाेती. शिवाय, एकमेकांकडे ये-जा हाेती. अय्याजने आराेपींपैकी एकाच्या अल्पवयीन बहिणीसाेबत बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे तसेच त्याच्या आईला मारहाण केल्याची माहिती मिळाली हाेती. अय्याज व त्याची बहीण रविवारी सायंकाळी एकाचवेळी घराबाहेर जात असल्याचेही त्याच्या लक्षात आले हाेते.

त्याने हा प्रकार मित्राला सांगितला आणि अय्याजच्या खुनाची याेजना आखली. दरम्यान, दाेन्ही आराेपींनी अय्याजला रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास राकेश झा यांच्या वलनी येथील शिवारात बाेलावले. ताे शेतात येताच अंधाराचा फायदा घेत इरफानने त्याला पकडले आणि मेहबूबने त्याच्या पाेटावर चाकूने वार केले. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच मृतदेह चादरीत गुंडाळला व शेताजवळील नाल्याकाठच्या झुडपात फेकला. शिवाय, त्याचा माेबाईल फाेनही फाेडला.

दाेघांनी चाकू तलावात फेकून उत्तर प्रदेशच्या दिशेने निघाले. मात्र, आराेपींच्या नातेवाईकांपैकी एकाने या घटनेची माहिती पाेलीस कर्मचारी उमेश ठाकरे यांना दिली व बिंग फुटले. पाेलिसांनी दाेघांचे समुपदेशन करीत आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. त्यांच्या मदतीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीला पाठविला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक सूर्यप्रकाश मिश्रा करीत आहेत. 

अंघाेळ करतानाचा व्हिडिओअय्याजने दाेन वर्षापूर्वी आराेपींपैकी एकाच्या अल्पवयीन बहिणीचा अंघाेळ करतानाचा माेबाईलमध्ये व्हिडिओ तयार केला हाेता. याच व्हिडिओचा वापर करीत त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली व तिच्यावर लैंगिक अत्याचार करून नंतर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. अय्याजने त्या मुलीला विश्वासात घेत लग्न करण्याची बतावणी करीत शरीरसंबंध सुरूच ठेवले. तिच्यासमाेर त्याने ताे व्हिडिओ त्याच्या फाेनमधून डिलिट केला. मात्र, त्याने ताेच व्हिडिओ मित्राच्या फाेनमध्ये काॅपी करून राखून ठेवला हाेता.

मुलीच्या आईला मारहाण

दाेघांच्याही शरीरसंबंधाची माहिती मुलीच्या आईला मिळाली हाेती. त्यामुळे तिच्या आईने अय्याजसाेबत भांडणही केले हाेते. त्यावेळी अय्याजने तिच्या आईला ताे व्हिडिओ दाखवून शरीरसंबंधाला आळा घातल्यास साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली हाेती. मुलीची आई व अय्याज यांच्यात रविवारी जाेरात भांडण झाले हाेते. यात अय्याजने तिच्या आईला लाकडी दांड्याने मारहाण केली हाेती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी