शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील एमआयडीसी भागात गुन्हेगाराचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:23 IST

रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर रोडवर फिरायला गेलेल्या तरुणाचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह एमआयडीसी परिसरातील नागपूर-हिंगणा मार्गावरील आयसी चौकात आढळून आला. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील एकाच्या भावाच्या खुनात मृत तरुणाचा सहभाग असल्याने त्याने बदला घेण्यासाठी त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देतीन संशयितांना घेतले ताब्यात : भावाच्या हत्येचा बदला घेतल्याचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर रोडवर फिरायला गेलेल्या तरुणाचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह एमआयडीसी परिसरातील नागपूर-हिंगणा मार्गावरील आयसी चौकात आढळून आला. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील एकाच्या भावाच्या खुनात मृत तरुणाचा सहभाग असल्याने त्याने बदला घेण्यासाठी त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.श्रीकांत रमेश गुहे (२३, रा. राजगृहनगर, हिंगणा रोड, नागपूर) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी पंकज अंबादे याच्यासह अन्य दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. श्रीकांतने गुरुवारी रात्री घरी जेवण केले आणि फिरायला बाहेर गेला. त्यानंतर तो घरी परतला नाही. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या नागरिकांना त्याचा मृतदेह आयसी चौकात रोडच्या कडेला पडला असल्याचे निदर्शनास आले.पंकज अंबादे यांचा भाऊ अमित याच्या खूनप्रकरणात अजनी (नागपूर) पोलिसांनी श्रीकांतला अटक केली होती. त्यानंतर त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. याची माहिती पंकजला होती. त्याला त्याच्या भावाच्या खुनाचा बदला घ्यावयाचा होता.श्रीकांत बाहेर दिसताच पंकज व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी पंकज व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्याच्या साथीदारांची नावे कळू शकली नाहीत.नागरिकांनी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. डेहनकर करीत आहेत.खूनप्रकरणात अटकश्रीकांत हा गांजा विक्री करायचा. त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गांजा विक्री व खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. अजनी (नागपूर) पोलिसांनी त्याला वर्षभरापूर्वी अमित अंबादे यांच्या खूनप्रकरणात अटक केली होती. तो काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता.

टॅग्स :MurderखूनMIDCएमआयडीसी