शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बीआरएसपीचे सुरेश मानेंनी केले शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:17 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि विदर्भ निर्माण महामंचचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अ‍ॅड सुरेश माने यांनी झंझावाती प्रचार केला. दक्षिण नागपुरातील प्रचार कार्यालयातून सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. निळे झेंडे, प्रचाररथ, दुचाकीवर स्वार कार्यकर्त्यांनी वेगळा विदर्भ झालाच पाहिजेच्या घोषणा देऊन रॅलीद्वारे शहरभर प्रचार केला.

ठळक मुद्देवेगळा विदर्भ झालाच पाहिजेच्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि विदर्भ निर्माण महामंचचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अ‍ॅड सुरेश माने यांनी झंझावाती प्रचार केला. दक्षिण नागपुरातील प्रचार कार्यालयातून सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. निळे झेंडे, प्रचाररथ, दुचाकीवर स्वार कार्यकर्त्यांनी वेगळा विदर्भ झालाच पाहिजेच्या घोषणा देऊन रॅलीद्वारे शहरभर प्रचार केला.बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि विदर्भ निर्माण महामंचचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अ‍ॅड सुरेश माने यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाररथ, दुचाकी, आॅटोवर पक्षाचे झेंडे घेऊन बीआरएसपी जिंदाबाद, अ‍ॅड सुरेश माने तुम आगे बढो, बीआरएसपी आयी है, नयी रोशनी लायी है, वेगळा विदर्भ झालाच पाहिजेच्या घोषणा दिल्या. रॅली म्हाळगीनगर, गजानननगर, महाकालीनगर, बेलदारनगर, वैभवनगर, दिघोरी, वाठोडा, खरबी चौक, हिवरीनगर, पडोळेनगर, शास्त्रीनगर, नंदनवन, मोठा ताजबाग, डायमंडनगर, भांडेप्लॉट, सक्करदरा झोपडपट्टी, अयोध्यानगर, नवीन सुभेदार, आशीर्वादनगर, संजयनगर, वैष्णोमातानगर, सिद्धेश्वरनगर, भोले बाबानगर, उदयनगर, जानकीनगर, आकाशनगर, ज्ञानेश्वरनगर, जुना सुभेदार, महात्मा फुलेनगर, रिपब्लिकन वसाहत, भगवाननगर या मार्गाने काढण्यात आली. मानेवाडा येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा देऊन अ‍ॅड सुरेश माने यांच्या एअर कंडीशनर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. रमेश पिसे, दिनकर वाठोरे, संतोष ठवरे, दादा हटवार, राहुल सुर्यवंशी, श्रीराम कोसे, अ‍ॅड वासुदेव वासे, अ‍ॅड विकास गणवीर, प्रेमकुमार म्हैसकर, पुरुषोत्तम कामडी, संजय हटवार, हरिकिशन हटवार, मनोज गजभिये, सत्यविजय गोंडाणे, लक्ष्मण खोब्रागडे, सौरभ गाणार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019