शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

टुन्न फौजदाराची भाईगिरी

By admin | Updated: February 27, 2016 03:17 IST

दारूच्या नशेत टुन्न असलेल्या ग्रामीण पोलीस दलातील एका फौजदाराने (एएसआय) बेदरकारपणे वाहन चालवून मानकापूर परिसरात चांगलाच गोंधळ घातला.

नागपूर : दारूच्या नशेत टुन्न असलेल्या ग्रामीण पोलीस दलातील एका फौजदाराने (एएसआय) बेदरकारपणे वाहन चालवून मानकापूर परिसरात चांगलाच गोंधळ घातला. त्याच्या या बेजबाबदारपणामुळे झिंगाबाई टाकळी परिसरात शुक्रवारी दुपारी तणाव निर्माण झाला होता. राकेश उत्तम यादव (वय ४५) असे गोंधळ घालणाऱ्या फौजदाराचे नाव आहे. तो गोधनीत राहतो. नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (परिक्षणार्थी) अजित हगवणे यांच्या वाहनावर यादव चालक आहे. हगवणे क्राईम मिटींगच्या निमित्ताने नागपुरात आले होते. शुक्रवार दुपारी २.३० सुमारास हगवणे बैठकीत असताना यादव नागमोते नामक पोलीस कर्मचाऱ्यासह शासकीय वाहनाने (एमएच ३१/ सीव्ही ५१) घराकडे निघाला. तो दारूच्या नशेत टुन्न होता. गीतानगर परिसरात कारला पोलीस जीपचा कट लागला. कारवाईचा दिला दमनागपूर : यादव खाली उतरला आणि कारचालकासोबत भाईगिरी करू लागला. पोलिसाच्या वाहनाला धडक मारल्याचा आरोप करून कारवाईचा दम देऊ लागला. पोलीसासोबत बाचाबाची सुरू असल्याचे पाहून तेथे मोठी गर्दी जमली. दारूच्या नशेत यादव भाईगिरी करीत असल्यामुळे अनेकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. नागरिकांमध्ये रोष निर्माण झाल्याने प्रकरण अंगलट येण्याचे संकेत मिळताच यादवचा साथीदार घटनास्थळावरून निघून गेला. संतप्त नागरिकांनी माहिती दिल्यामुळे मानकापूरचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. त्यांनी कारचालक तसेच यादवला मानकापूर ठाण्यात नेले.पहिल्याच बैठकीत ओळख ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून अनंत रोकडे यांनी एक आठवड्यापूर्वी पदभार स्वीकारला. त्यांची ही पहिलीच क्राईम मिटींग होती. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांची ओळख करून त्यांच्या भागात काय समस्या आहे, त्याची माहिती अधीक्षक करून घेत होते. तेवढ्यात यादवच्या प्रतापाचे वृत्त क्राईम मिटींगमध्ये पोहचले. नंतर पुढचे सर्वच विषय मागे पडले. पहिल्याच बैठकीत नवीन पोलीस अधीक्षकांना ग्रामीण पोलिसांच्या वृत्तीची ओळख झाली.(प्रतिनिधी)