शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मृत बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भाऊ हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:43 IST

मृत बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भावाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. बहिणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी महत्त्वाचा पुरावा असलेले एक रजिस्टर हरवल्यामुळे खटला आरोपीच्या बाजूने झुकला आहे. या प्रकरणाचा सीबीआय किंवा अन्य सक्षम संस्थेमार्फत तपास करण्यात यावा असे भावाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देप्रियकरावर खुनाचा आरोप : गुन्हा सिद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मृत बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भावाने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. बहिणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी महत्त्वाचा पुरावा असलेले एक रजिस्टर हरवल्यामुळे खटला आरोपीच्या बाजूने झुकला आहे. या प्रकरणाचा सीबीआय किंवा अन्य सक्षम संस्थेमार्फत तपास करण्यात यावा असे भावाचे म्हणणे आहे.राजेश भवनानी असे भावाचे नाव असून तो मूर्तिजापूर, जि. अकोला येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणीचे नाव कविता होते. आरोपीचे नाव अंकुश बन आहे. २०१० मध्ये शेगाव, जि. बुलडाणा येथील एका हॉटेलमध्ये कविताचा मृतदेह आढळून आला होता. आरोपी अंकुशला कवितासोबत लग्न करायचे नव्हते. त्यामुळे त्याने तिचा खून केला अशी तक्रार आहे. हॉटेलमधील खोली भाड्याने घेताना अंकुशने रजिस्टरवर खोटे नाव लिहिले असे तपासात आढळून आले. त्यामुळे ते रजिस्टर हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवून अहवाल मागविण्यात आला होता. यासंदर्भातील खटला खामगाव सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. सरकारी वकिलाने सत्र न्यायालयात सादर करण्यासाठी पोलिसांना हॉटेलचे रजिस्टर मागितले होते. परंतु, पोलिसांना रजिस्टर सादर करण्यात अपयश आले. रजिस्टर कुठे गेले कुणालाच माहिती नाही. दरम्यान, सरकारचे काही महत्त्वाचे साक्षीदारही फितूर झाले. या बाबी लक्षात घेता पोलीस व आरोपींनी गुन्हा सिद्ध होऊ नये यासाठी संगनमत केल्याचे स्पष्ट होते असे भवनानी यांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने राज्याच्या गृह विभागाचे सचिव, बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक व शेगाव पोलिसांना नोटीस बजावून यावर १० आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. तसेच, तेव्हापर्यंत सत्र न्यायालयातील खटल्यावर स्थगिती दिली. भवनानी यांच्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर