शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

६० मीटर लांब पूल तोडला

By admin | Updated: November 17, 2016 02:47 IST

पूल एकूण ४०० मीटर लांब आहे. त्यात दोन्ही बाजूला ३०० मीटर अप्रोच रस्ता आहे. प्रत्यक्ष १०० मीटर उड्डाण पूल

मोठ्या क्रशर मशीन्सचा उपयोग : कडेकोट सुरक्षानागपूर : मोठ्या मशीन्सच्या मदतीने छत्रपती उड्डाण पुलाचे २० मीटरचे तीन टप्पे दुसऱ्या दिवशी बुधवारी रात्री तोडण्यात आले. कामाची गती पाहता ३० नोव्हेंबरपूर्वीच पूल जमीनदोस्त होऊन मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)४०० मीटर लांब पूलपूल एकूण ४०० मीटर लांब आहे. त्यात दोन्ही बाजूला ३०० मीटर अप्रोच रस्ता आहे. प्रत्यक्ष १०० मीटर उड्डाण पूल २० मीटरच्या पाच टप्प्यामध्ये सहा मशरूम आकाराच्या पिलरवर उभा आहे. बुधवार रात्रीपर्यंत २० मीटरचे तीन टप्पे अर्थात ६० मीटर लांब पूल तोडण्यात आला. उर्वरित दोन टप्पे गुरुवारी तोडण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही बाजूकडील १५०-१५० मीटरचे रस्त्याचेही तोडकाम सुरू आहे. बारीक तुकड्यांचा बांधकामात उपयोग२० मीटर लांब एका टप्प्यात १४ गर्डर (स्लॅब) टाकण्यात आले आहेत. ते एवढे मजबूत आहेत की, तोडताना विशेष परिश्रम घ्यावे लागत आहे. तोडल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या खापरी रोडवरील यार्ड ग्रेड विभागात नेण्यात येत आहेत. त्याला बारीक करून मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामात किंवा डीपी रस्त्यांसाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. ६०० ट्रक मलबा हटविलापूल तोडल्यानंतर रस्त्यावर पडलेला मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसात ६०० ट्रक कॉन्क्रिट मलबा हटविण्यात आला. याशिवाय पुलाच्या सळाकी कटरने तोडण्यात येऊन यार्ड ग्रेडमध्ये नेण्यात येत आहेत. धूळीवर पाण्याचा मारापूल तोडताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांनी मास्क लावले आहेत. धूळ इतरत्र उडू नये म्हणून एका मशीनद्वारे त्यावर पाण्याचा मारा करण्यात येत आहे. लोकांची गर्दीपुलाच्या आठवणी मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी लोकांनी दुसऱ्या दिवशीही गर्दी केली होती. अनेकजण मुलांसोबत पुलाचे तोडकाम पाहात होते. अनेकांनी पूल तोडण्याचे व्हिडिओ तयार केले.चारही बाजूला सुरक्षा व्यवस्थारस्त्याच्या चारही बाजूला सुरक्षा रक्षक तैनात होते. लोक उत्सुकतेपोटी तोडकाम जवळून पाहण्यासाठी पुलाजवळ जात होते. पण त्यांना आत जाण्यास सुरक्षा रक्षक मनाई करीत होते. या रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली असून, त्या ठिकाणीही जलद कृती पथक तैनात होते. गडकरी व बावनकुळे यांची भेटउड्डाण पुलाचे बांधकाम २००० मध्ये युती सरकारच्या काळात झाले. त्यावेळी नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. या पुलाचे तोडकाम पाहण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सायंकाळी भेट दिली आणि त्यांनी स्वत:चे नाव व ‘गूड मॅनेज वर्क’ असा शेरा त्यांनी पुलाच्या भिंतीवर लिहिला. याशिवाय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या स्थळी भेट देऊन तोडकामाची पाहणी केली. पहिला टप्पा रात्री १.२० वाजता, दुसरा बुधवारी दुपारी १२.३० वाजता, तिसरा टप्पा रात्री १० वाजता तोडला.६०० ट्रक मलबा हटविलामलब्याचा मेट्रो प्रकल्पात उपयोग