शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विटभट्टी कामगारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:52 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनचा फटका कोराडी परिसरातील विटांच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांनाही बसला आहे.

ठळक मुद्देमालकाने सोडले वाऱ्यावरशिधापत्रिका नसल्याने धान्यही मिळेना

दिनकर ठवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनचा फटका कोराडी परिसरातील विटांच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांनाही बसला आहे. सदर कामगार दुसऱ्या जिल्ह्यातून येथे उपजीविकेसाठी आले आहेत. सध्या त्यांचे काम गेल्याने मालकाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्याकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना शासनाकडून पुरेसे स्वस्त धान्य मिळण्याची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.कोराडी वीज केंद्राच्या मागच्या भागाला मोठ्या प्रमाणात विटांच्या भट्ट्या आहेत. शिवनी (मध्य प्रदेश), बालाघाट (मध्य प्रदेश), भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील कामगार त्या विटांच्या भट्ट्यांवर काम करीत असून, ते याच परिसरात कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर काही भट्ट्यांवरील काम बंद करण्यात आले तर काही भट्ट्यांवरील काम अजूनही सुरूच आहे. कामगारांनी मात्र त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण सोडले नाही. काम बंद झाल्यानंतर मालकांनी कामगारांना सुरुवातीला थोडीफार आर्थिक मदत केली. परंतु, लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्याने त्यानेही कामगारांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.काम बंद असल्याने त्यांना मजुरी मिळत नाही. मालक अतिरिक्त पैसे द्यायला तयार नाही. शिधापत्रिका नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करणे शक्य नाही. खिशात पैसे नसताना किराणा दुकानातून महागडे धान्य व इतर जीवनावश्यक साहित्य खरेदी करणेही त्यांच्या आवाक्याबाहेर आहे.स्थानिक मतदारयाद्यांमध्ये नाव नसल्याने राजकीय नेतेही त्यांना मदत द्यायला तयार नाही. ही परिस्थिती कामगाराच्या एका कुटुंबाची नसून एकूण ८० कुटुंबाची आहे. येथे त्यांना खायला काही नाही तर प्रशासन त्यांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली असून, भूकबळीची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस