शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सीबीआयने पकडला लाचखोर अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:06 IST

विविध कंपन्यात मनुष्यबळ पुरविणाऱ्या एका कंपनीचालकाला कारवाईचा धाक दाखवून तीन लाखांची लाच मागणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाच्या (ईपीएफओ) एका अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने रविवारी अटक केली.

ठळक मुद्देतीन लाखांची लाच मागितली५० हजार स्वीकारले भविष्य निर्वाह निधी खात्याचा अधिकारी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध कंपन्यात मनुष्यबळ पुरविणाऱ्या एका कंपनीचालकाला कारवाईचा धाक दाखवून तीन लाखांची लाच मागणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाच्या (ईपीएफओ) एका अधिकाऱ्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) पथकाने रविवारी अटक केली. ए. बी. पहाडे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो अंमलबजावणी अधिकारी असल्याचे समजते.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विविध कंपन्यांना मनुष्यबळ पुरविणाऱ्या एका कंपनीचे सात वर्षांपासून आॅडिट झाले नव्हते. पहाडे यांनी या कंपनीच्या संचालकाला तशी सूचना देऊन संभाव्य कारवाईचा धाक दाखवला. हे सर्व टाळायचे असेल तर तुम्हाला साडेतीन लाख रुपये लाच द्यावी लागेल, असे म्हटले. कोणतीही गडबड नसल्याने एवढी रक्कम लाच म्हणून देणे शक्य नसल्याने संबंधित कंपनीच्या संचालकांनी पहाडेंना रक्कम कमी करण्यास सांगितले. पहाडेंनी साडेतीन वरून तीन लाख रुपयात सौदा पक्का करण्याची तयारी दर्शविली. त्यापेक्षा एक रुपयाही कमी घेणार नसल्याचे पहाडेंनी म्हटल्याचे समजते. त्यामुळे कंपनी संचालकांनी त्याची स्थानिक सीबीआय अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली.सीबीआयने शहानिशा करून घेतल्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे कारवाईचा सापळा लावला. कंपनी संचालकाने ठरल्याप्रमाणे ५० हजारांची पहिली किस्त घेण्यासाठी पहाडेंना लक्ष्मीनगरातील एका हॉटेलमध्ये रविवारी दुपारी बोलविले. तेथे पोहचलेल्या पहाडेंनी लाचेचे ५० हजार रुपये स्वीकारताच त्यांना सीबीआयच्या पथकाने अटक केली. ही कारवाई सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक एस. डी. मिश्रा यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक नीरजकुमार गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

वरिष्ठाचे नाव घेतलेया कारवाईनंतर सीबीआयच्या पथकाने पहाडेंच्या लक्ष्मीनगरातील घर आणि कार्यालयाचीही झडती घेतली. त्या झडतीत मालमत्तेची कागदपत्रे आणि रोख सापडल्याची चर्चा होती. दुसरे म्हणजे, लाच घेताना पकडल्यानंतर पहाडेने ही लाच आपण एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी घेतल्याचा कांगावा केला. या संबंधाने सीबीआय अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग