शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

लाचखोर अडकले

By admin | Updated: September 3, 2015 02:29 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी महापालिका आणि सिटी सर्व्हे विभागातील दोन कर्मचाऱ्यांना दलालासह लाच घेतांना पकडले.

कर निरीक्षक व सर्व्हेयरसह चौघांना अटक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची हॅट्ट्रिक नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी महापालिका आणि सिटी सर्व्हे विभागातील दोन कर्मचाऱ्यांना दलालासह लाच घेतांना पकडले. एसीबीने सलग दोन दिवसात तीन कार्यालयांवर कारवाई केली. मंगळवारी वाहतूक निरीक्षक आणि त्याच्या दलालाला पकडले होते. एसीबीच्या ‘हॅट्ट्रिक ’मुळे शासकीय विभाग हादरले आहेत. पहिली कारवाई महापालिकेच्या धंतोली झोनमध्ये झाली. येथील कर निरीक्षक गोपाल रुसिया आणि दलाल अर्चना वासनिकला एसीबीने लाच घेतांना पकडले. भंडारा येथील डॉ. प्रदीप वैद्य यांचा काँग्रेसनगर येथे फ्लॅट आहे. त्यांनी आपला फ्लॅट भाड्याने दिला आहे. अर्चना धंतोली झोनमध्ये अधिकाऱ्यांची दलाली करते. तिने डॉ. वैद्य यांना फोन केला आणि म्हणाली ‘तुम्ही फ्लॅट भाड्याने दिला आहे. त्यांच्याकडून दरमहा १५ हजार रुपये भाडे घेता. त्यामुळे तुमच्या फ्लॅटवर व्यावसायिक कर लावला जाईल. तुम्हाला ८० हजार रुपये वार्षिक कर द्यावा लागेल. डॉ. वैद्य यांनी जेव्हा कर देण्याची तयारी दर्शविली तेव्हा अर्चनाने स्वत:ला धंतोली झोन कार्यालयातील कर्मचारी असल्याचे सांगितले. तसेच अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध असून प्रस्तावित संपत्ती करात वाढ करून व्यावसायिक कर लावणार नाही. यासाठी अर्चनाने ४० हजार रुपयाची मागणी केली. अर्चनाच्या मागणीमुळे डॉ. वैद्य चक्रावले, लाच देण्याची तयारी नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. २८ आॅगस्ट रोजी तक्रार खरी असल्याला दुजोरा मिळाला. योजनेनुसार डॉ. वैद्य यांनी बोलणी केली. ३५ हजार रुपयावर सौदा पक्का झाला. मंगळवारी अर्चनाने डॉ. वैद्य यांना फोन करून बुधवारी पैसे घेऊन यायला सांगितले. ठरलेल्या योजनेनुसार एसीबीची चमू डॉ. वैद्य यांच्यासह धंतोली झोन कार्यालयात पोहोचली. अर्चनाने डॉ. वैद्य यांना पैसे घेऊन दीनानाथ हायस्कूलजवळ बोलावले. तिने डॉ. वैद्य यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर रुसिया यांच्याशी संपर्क साधला. रुसियाने तिला सांगितले की, सध्या पैसे स्वत:जवळच ठेव नंतर हिशेब करू. यानंतर एसीबीचे निरीक्षक आसाराम सेटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रुसियाला धंतोली झोन कार्यालयातून अटक केली. अर्चना पूर्वी धंतोली झोनमध्ये डिमांड नोट वितरित करण्याचे काम करीत होती. ते काम बंद झाल्याने ती दलाली करू लागली. तिला प्रत्येक ग्राहकाच्या मोबदल्यात अडीच हजार रुपये मिळत होते. उर्वरित रक्कम कर निरीक्षक किंवा संबंधित अधिकारी स्वत: घेतात. दुसऱ्या कारवाईत सिटी सर्व्हे विभागाचा सर्व्हेयर १० हजार रुपयाची लाच घेताना सापडला. सुधीर रामेश्वर कावरे (३५) रा. म्हाडा कॉलनी असे आरोपीचे नाव आहे. कळमना येथील यशवंत रहांगडाले यांचा कळमना येथे प्लॉट आहे. यशवंतला सिटी सर्व्हेमधील दस्तऐवजावर आपले नाव नोंदवायचे होते. यशवंत यांनी आपले कर्मचारी विजय बचाले यांना अधिकार पत्र देऊन सिटी सर्व्हेमध्ये अर्ज केला. बचाले यांनी ११ जून रोजी अर्ज केला. सोबत यासंदर्भात कावरे यांच्याशी भेट घेतली. कावरेने १० हजार रुपयाची मागणी केली. रहांगडाले यांनी एसीबीकडे तक्रार केली. ठरलेल्या योजनेनुसार कावरेने बुधवारी दुपारी अजनी चौकात पैसे घेऊन बोलावले. तिथे त्याला रंगेहात पकडण्यात आले.(प्रतिनिधी)संपातही कारवाईबुधवारी शासकीय कर्मचाऱ्यांचा संप होता. या संपादरम्यानच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा हादरून गेले. संपादरम्यान दिवसभर या कारवाईचीच चर्चा होती. एसीबीने कारवाई यशस्वी करण्यासाठी वर्धा आणि चंद्रपूरच्या चमूची मदत घेतली. प्रत्येक ठिकाणी दलाल एसीबीने नुकत्याच केलेल्या कारवाईत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसह दलालही सापडले आहेत. गेल्या आठवड्यात नेहरूनगर झोनमध्ये उपअभियंत्याला ओसीडब्ल्यू कर्मचाऱ्याच्या माध्यमातून लाच घेतांना पकडण्यात आले. आरटीओ आणि धंतोली झोनमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत सुद्धा दलाल सापडले. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये दलालांचे साम्राज्य असल्याचे उघडकीस आले आहे.